लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच डोंबिवली शहरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात उत्सव, महोत्सव भरविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे दहा वर्ष मुंबईत होणारा ग्लोबल कोकण महोत्सव यावर्षी डोंबिवलीत होत असल्याने कोकणी मतदारांना आपलेसे करण्यासाठी हा महोत्सव भरविण्यात येत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचा या महोत्सवात सहभाग असून या महोत्सवाचे ते स्वागताध्यक्ष आहेत.
कोकण महोत्सवाची पत्रकार परिषद ठाणे येथे घेण्यात आली. मात्र, त्याचदिवशी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत (शिंदे गट ) प्रवेश केल्याने श्रीकांत शिंदे या पत्रकार परिषदेला पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर या कार्यक्रमाची पत्रकार परिषद डोंबिवली येथे घेण्यात येईल, असे पुन्हा सांगण्यात येत आहे.
या कोकण महोत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोकणातील लोकांचा सहभाग असतो. गेल्या दहा वर्षांपासून हा कार्यक्रम मुंबई येथील गोरेगाव नेस्को सेंटर येथे भरविला जातो. मात्र यावर्षी डोंबिवली शहरात कोकण वासियांची मते अधिक आहेत, हे लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन डोंबिवलीत केल्याचे दिसून येत आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शासनाचा सहभाग...
हा संपूर्ण ग्लोबल कोकण महोत्सवाला कोकण भूमी प्रतिष्ठान, पर्यटन संचनालय- महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी सहाय्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या कार्यक्रमाचे बॅनर चर्चेचा विषय
या महोत्सवाच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे फोटो देखील झळकले आहेत. सध्या हे बॅनर या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक असणाऱ्या संजय यादवराव यांच्या फेसबुकवर दिसून येत आहे.
श्रीकांत शिंदेंची संपूर्ण टीम लागली कामाला
कल्याण जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते गोपाळ लांडगे यांच्या हस्ते महोत्सवाच्या उभारणीला सुरुवात केली. ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा चौकजवळ डोंबिवली पूर्व येथे दोन लाख स्क्वेअर फुटावर या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकांत शिंदे यांची डोंबिवलीमधील संपूर्ण टीम कामाला लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.