Shiv Sena MLA Disqualification : उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार? शिंदे गटाच्या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी

Bharat gogawale : ठाकरे गटात 16 आमदार आहेत. त्यातील 14 आमदार अपात्र ठरले तर अवघे दोन आमदार उद्धव ठाकरे गटात राहतील.
Eknath Shinde. Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Eknath Shinde. Rahul Narwekar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला आहे. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाच्या आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवले. त्यामुळे ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तर, शिंदे गटाने सुद्धा या प्रकरणी कोर्टात धाव घेतली. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात मुंबई उच् न्यायालयात याचिका दाखल केली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. मग शिंदे गटाकडून देण्यात आलेला व्हीप कसा लागू होत नाही?, तो न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर आज (बुधवार) सुनावणी होणार आहे.

Eknath Shinde. Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड,शिवसेनेचा पुनर्जन्म…; जनता न्यायालयाचा 'मास्ट्रर स्ट्रोक' यशस्वी

भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वी गोगावले यांनी याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णया विरोधात याचिका करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर शिंदे गट देखील न्यायालयात गेला आहे. आपणच खरी शिवसेना आहोत मग आपला व्हिप कसा लागू होत नाही, असा सवाल करत एकनाथ शिंदे गटाकडून ठाकरेंच्या 14 आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासंदर्भात जी याचिका आहे. त्यामध्ये 16 आमदारांमधील आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांची नावे वगळ्यात आली आहेत. त्यामुळे जर ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर या दोघांची नावे शिंदे गटाच्या याचिकेत नसल्याने त्यांना अपात्र ठरवता येणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)


न्यायालयाने जर शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला तर संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरी या 14 आमदार पात्र ठरू शकतात. ठाकरे गटात 16 आमदार आहेत. त्यातील 14 आमदार अपात्र ठरले तर अवघे दोन आमदार उद्धव ठाकरे गटात राहतील. मात्र, ही याचिका उच्च न्यायालयात असल्याने ठाकरे गटाकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय आहे. त्यात ठाकरे गटाकडून देखील विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आधीच सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केली. आपण जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भरत गोगावलेंच्या याचिकेवर सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे. या सुनावणीत जर शिंदे गटाला दिलासा देत ठाकरेंच्या विरोधात निकाल दिला तर तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो. उच्च न्यायालयात ही याचिका असल्याने न्यायालय आमच्या बाजुने आहे, अशी प्रचाराची संधी देखील शिंदे गटाला मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com