Gopichand Padalkar Controversy : पडळकरांनी स्वतःच्या हाताने दगड मारून घेतला? शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन

Sharad Pawar on Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे.
Gopichand Padalkar, Devendra Fadnavis, Sharad Pawar, Jayant Patil
BJP MLA Gopichand Padalkar addressing a public rally in Sangli where he made controversial remarks against Jayant Patil, sparking sharp political backlash.Sarkarnama
Published on
Updated on

Gopichand Padalkar Controversy : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला आहे.

पडळकरांच्या या वक्तव्याचे निषेध सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. पडळकरांची टीका ही राज्याच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेची दखल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील घेतली आहे.

शरद पवारांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, अशी गलीच्छ टीका करणं योग्य नाही, असं शरद पवारांनी फडणवीसांना फोनवरून म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

Gopichand Padalkar, Devendra Fadnavis, Sharad Pawar, Jayant Patil
Vishwajeet Kadam : जयंत पाटलांसाठी विश्वजीत कदम मैदानात, गोपीचंद पडळकरांना सुनावले, 'टोकाचे वैमनस्य असले तरी...'

तसंच पवारांनी गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पातळी सोडून बोलणाऱ्या पडळकरांवर काय कारवाई कराणार का? की नेहमीप्रमाणे त्यांना बेताल वक्तव्य करण्यासाठी मोकळं रान देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Gopichand Padalkar, Devendra Fadnavis, Sharad Pawar, Jayant Patil
Amol Kolhe Letter : 'आपली पात्रता काय.. आपण बोलतोय काय?' पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यानंतर खासदाराचे थेट फडणवीसांना पत्र

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

सांगलीत बोलताना गोपीचंद पडळकर यानी जयंत पाटलांवर टीका केली. यावेळी त्यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं. जयंत पाटील यांचा एकेरी केला. पडळकर म्हणाले, 'जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे.

दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतो. गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिका**ची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटलांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com