Gopichand Padalkar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भूजबळ यांनी काही दिवसापूर्वी सरस्वती मातेवर टीका केली होती. त्याबाबत भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. पडळकर गुरुवारी पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
"छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडे काहीही काम उरलेले नाही," अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. "शारदामाता आणि सरस्वती मातेचा फोटो हवा कशाला," असे वादग्रस्त वक्तव्य छगन भूजबळ यांनी केले होते.
"छगन भुजबळ त्यांच्या पद्धतीने भूमिका मांडत असतात. पण लोकांच्या भावना महत्वाच्या आहे. छगन भुजबळ सध्या विरोधी पक्षांमध्ये त्यांच्याकडे काहीच काम शिल्लक नाही, राज्यात गदारोळ निर्माण होण्यासाठीच भुजबळ अशी विधान करीत असतात," असे पडळकर म्हणाले.
एमपीएसपी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी पडळकरांनी आज (गुरुवारी) या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, "एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि भूमिका सरकारी दरबारी मांडणार आहे. विद्यार्थ्यांना भेटल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्यांचे प्रश्न कळणार नाहीत,"
सध्याच्या सरकारने एमपीएससी विद्यार्थ्यांचे विषय सकारात्मक घेतले आहेत. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विद्यार्थ्यांच्या अनेक नियुक्त्या दिल्या आहेत. येत्या मंगळवारी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे,"
महाविकास आघाडी सरकार असताना पडळकरांनी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरुन मोठे आंदोलन केले होते. आता त्यांनी या प्रश्नाबाबत मिळमिळत भूमिका घेतली आहे, असा आरोप यावेळी पत्रकारांनी केला. त्यावर पडळकर म्हणाले, "मी आताही या विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडतच आहे.याआधी एमपीएससीच्या परीक्षा पाच वेळा पुढे गेल्या होत्या म्हणून आंदोलन केलं होतं,"
पडळकर यांच्या गावाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यांची आई सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्या बिनविरोध निवडून येतील, अशी चर्चा सध्या सुरु आहे. याबाबत पडळकरांना विचारले असता ते म्हणाले, "गेल्या अनेक वर्षांपासून गावातील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असतात. गावातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी माझ्या आईचं नाव सुचवलं ते प्रक्रिया चालू आहे अजून निवडणूक पार पडलेली नाही. पण मी आणि माझ्या भावाने त्याला विरोध केला आहे. अन्य दुसऱ्याला सरपंच करा असे सूचवलं आहे,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.