Maharashtra Budget Session : विधीमंडळातील हिरकणी कक्षाबाबत गोऱ्हे आक्रमक; म्हणाल्या "स्वतःच्या..."

Saroj Ahire : बालसंगोपन कक्षाकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई करणार
Nilam Gorhe
Nilam GorheSarkarnama
Published on
Updated on

Nilam Gorhe : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला त्यांच्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आल्या होत्या. त्यावेळी तेथे बाळासाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. अहिरे बाळाला घेऊन सभागृहात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतूक झाले होते.

आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात अहिरे आपल्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन आल्या होत्या. तेथेही त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष तयार केला. मात्र तेथील अस्वच्छता पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. हिरकणी कक्ष खराब असल्याने तेथे बाळाला ठेऊ शकत नाही, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. बाळाची योग्य सोय झाली नसल्याने त्या विधीमंडळातून बाहेर पडल्या.

Nilam Gorhe
Eknath Khadse On Girish Mahajan: तेव्हा साडेसहा हजारांसाठी गिरीष महाजन विनवण्या करीत होते, आता कुठं आहेत?

अहिरे यांना आलेल्या अनुभवाची दखल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी घेतली आहे. विधीमंडळातील हिरकणी कक्षाची झालेल्या दुरवस्थेमुळे त्या आक्रमक झाल्या. मुलांचे संगोपनासाठी असणारा कक्ष स्वच्छ आणि सुसज्ज करण्यासाठी स्वखर्च करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या कक्षाची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा गोऱ्हे यांनी दिला.

Nilam Gorhe
Nawab Malik : मलिकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब : किडनी निकामी झाल्याची वकीलांची माहिती..

निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) म्हणाल्या की हिरकणी कक्ष सुसज्ज करण्यासाठी संबंधितांना सूचना केल्या आहेत. ते म्हणाल्या की, "विधीमंडळातील सरोज अहिरे (Saroj Ahire) यांच्या बालकाला राहण्याची व्यवस्था करायची होती. नागपूरलाही तशी व्यवस्था केली होती. मात्र विधीमंडलातील संगोपन कक्षाची दुरवस्था झाल्याने अहिरे यांना मनस्ताप झाला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांची विचारपूस केली आहे. दरम्यान या कक्षाची संबंधितांना सांगून तेथे बालकांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत."

Nilam Gorhe
Budget Session News: कांद्याने आणले सत्ताधाऱ्यांचा डोळ्यांत पाणी, ५१४ किलो कांद्याचे शेतकऱ्याला मिळाले २ रुपये ?

पुढे गोऱ्हे यांनी या कक्षाकडे दुर्लक्ष करणाऱ्याकडे कारवाई करण्याचा इशारा दिला. गोऱ्हे म्हणाल्या, "तो कक्ष पाहून तेथील व्यवस्था योग्य होईल याकडे मी स्वतः लक्ष देणार आहे. यासह या कक्षाची जबाबदारी असणाऱ्या व त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची चौकशी करणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाईचे आदेश देणार आहे."

Nilam Gorhe
Shivsena News; शिवसेना ठाकरे परिवाराचीच, कुणाच्या बापाची नाही!

हा कक्ष सुसज्ज करण्यासाठी गोऱ्हे यांनी स्वखर्च करण्याचीही तयारी दर्शविली. यावेळी गोऱ्हे म्हणाल्या की, "हिरकणी कक्ष सुसज्ज करण्यासाठी तेथे आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी विधिमंडळाला खर्च करण्यास अडचणी असतील तर उपसभापती या नात्याने मी स्वतःच्या खर्चातून त्या सुविधा उपलब्ध करून देईल. मात्र हा कक्ष सुसज्ज आणि अद्ययावतच असला पाहिजे अशी आमची इच्छा आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com