Raj Thackeray On Toll : टोल नाक्यांवर सरकारचे अन् मनसेचे कॅमेरे लागणार; राज ठाकरे आक्रमक!

Raj Thackeray On Toll : याचा अर्थ आतापर्यंत वसुली केली ती चुकीची होती, फडणवीसांवर निशाणा...
Raj Thackeray On Toll :
Raj Thackeray On Toll : Sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray On Toll : राज्यातील टोलवसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल दरवाढीवरून राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर आंदोलनं केली होती. मुलुंड टोलची दरवाढ केल्यानंतर मनसेच्या अविनाश जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. यानंतर राज ठाकरे यांनी सरकारमधील मंत्र्यांची टोलप्रश्नावरून भेट घेतली होती. (Latest Marathi News)

Raj Thackeray On Toll :
MNS Agitation : राज यांच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; मुलुंड, पनवेल, ऐरोली, बीडमधून टोल न घेता वाहने सोडली

मंत्र्यांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली ठाम भूमिका घेतली. या वेळी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त परिषद घेऊन याबाबत पुढची रणनीती स्पष्ट केली आहे. राज ठाकरे म्हणाले, काल मंत्र्यांच्या भेटीत टोलप्रश्नी काही गोष्टी ठरल्या आहेत. त्या लेखी स्वरूपात गोष्टी आणाव्यात म्हणून प्रयत्न करत आहे. नऊ वर्षांनतर या गोष्टींचा पाठपुरावा केला आहे. ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाहीत. २०२६ पर्यंत हे करार संपतात, असे राज ठाकरे म्हणाले.

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं. चारचाकी वाहनांना टोल आकारला जात नाही, मग आजपर्यंत आम्हाला फसवलं. याचा अर्थ आतापर्यंत वसुली केली ती चुकीची होती, अशी लोकांची भावना आहे. टोल नाक्यांवर प्रवेश पाॅइंटवर चाकचाकी वाहनांची टोलवसुली होते का? टोलवर कोणकोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत, ज्या झाल्या नाहीत," असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray On Toll :
Raj Thackeray News : मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाची रणनीती आज ठरणार; राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

"दर दिवसाला वाहनसंख्या वाढते. परंतु टोल नाक्यांवरून किती वाहने जातात, याचे आकडे कुठेच नाहीत. त्यामुळे प्रवेश पाॅइंटवर कॅमेरे लागतील. सरकारच्या वतीनेही लागेल आणि मनसे पक्षाच्या वतीनेही कॅमेरे लावले जातील, पंधरा दिवस किती वाहने येथे प्रवेश करतात, याचा हिशेब घेतला जाईल," असेही राज ठाकरे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com