Raj Thackeray News : मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाची रणनीती आज ठरणार; राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Eknath Shinde Meeting for Toll : राज्यातील टोलबाबत शिंदे-ठाकरेंच्या चर्चेकडे राज्याचे लक्ष
Eknath Shinde, Raj Thackeray
Eknath Shinde, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राज्यातील टोलविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी रान पेटवले आहे. ठाण्यातील पाच टोल नाक्यांवरील दरवाढीविरोधात मनसेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते. ते उपोषण मागे घेताना राज ठाकरेंनी टोलबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार राज हे गुरुवारी दुपारी चार वाजता मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत. या भेटीत काय चर्चा होणार आणि ठाकरे आंदोलनाबाबत काय निर्णय घेणार, याकडे राज्याचे लक्ष आहे. (Latest Political News)

मुंबईत टोल आंदोलनाच्या दिशेबाबत बोलताना सोमवारी राज यांनी महायुती आणि महाविकास आघाडीची पोलखोल केली होती. 'सत्तेतील प्रत्येक नेत्याने विरोधात असताना टोलमुक्त महाराष्ट्र करू, असा शब्द दिला आहे. त्या सर्वांनी सत्ता भोगलेली आहे.

मात्र, राज्यातील रस्ते टोलमुक्त झाले नाहीत. टोलच्या माध्यमातून जमा होणारा रोख पैसा सत्ताधाऱ्यांना रोज, आठवड्याला, महिन्याला मिळतो. त्यामुळे टोल हे सरकारचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे,' असा घणाघात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला होता.

Eknath Shinde, Raj Thackeray
Yogi Adityanath News : मोदींनंतर योगी आदित्यनाथच; सभा, रॅलीसाठी उमेदवारांमध्ये चढाओढ, शाहांचे नाव मागे पडले...

सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केल्यानंतर ठाकरेंनी टोल नाक्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलणार आहे. त्यानंतर टोलविरोधातील मनसेच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत. सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी चार वाजता उभयंतात टोलबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

या चर्चेत टोलवरील कोणत्या वाहनांना टोल द्यावा आणि कोणत्या नाही, आदी प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. दरम्यान, ठाकरेंनी टोलच्या पैशांचे काय होते, टोलवसुली करूनही रस्त्यांवर खड्डे का असे प्रश्न उपस्थित केले होते. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News)

टोलबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलतात, असा आरोप करून राज्यातील टोल म्हणजे सर्वात मोठे स्कॅम असल्याचा घणाघातही राज यांनी केला होता. लहान वाहनांना टोलमुक्त सोडले जाते, असे फडणवीसांनी सांगितले होते.

त्यानुसार प्रत्येक टोलवर मनसेचे कार्यकर्ते उभे राहून तपासणी करणार आहेत. तसेच फडणवीसांनी सांगितलेले खोटे निघाले तर टोल नाके जाळून टाकू, असा इशाराच ठाकरेंनी दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरेंच्या भेटीकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Raj Thackeray
Shiv Sena MLA Disqualification : आमदार अपात्रतेच्या सुनावणीनंतर अध्यक्ष नार्वेकर तातडीने दिल्लीला जाणार; काय आहे कारण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com