Deepak Kesarkar On Teachers Recruitment : शिक्षक भरतीसंदर्भात केसरकरांची मोठी घोषणा; पहिल्या टप्प्यात ३० हजारांची भरती तर...

Maharashtra Politics: गिरीश महाजन यांची भेट घेऊन आम्ही शिक्षकांच्या बदलीसंदर्भात सविस्तर चर्चा करु.
Deepak Kesarkar On Teachers Recruitment :
Deepak Kesarkar On Teachers Recruitment :Sarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar On Teachers Recruitment : "राज्यभरात लवकरच पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. या संदर्भात आजच जीआर देखील काढला जाईल" अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. तसेच,ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल, विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा सांगितला जाईल, असंही त्यांनी त्यांनी म्हटलं.

शिक्षक भरती संदर्भात बोलताना दीपक केसरकर म्हणाले, " आगामी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षकांची भरती करण्याचा आमचा मानस आहे. यात पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यासाठी जीआर काढण्याची प्रक्रियाही आजच केली जाईल. शंभर टक्के शिक्षक भरती करण्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. अशा उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची भरती करण्यात येईल.

Deepak Kesarkar On Teachers Recruitment :
Pratibha Pawar Hospitalized : मोठी बातमी ! शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आम्ही शिक्षकांच्या बदलीसंदर्भात सविस्तर चर्चा करु. तसेच, शिक्षक एकाच ठिकाणी स्थिर होण्यासाठी माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यादेखील रद्द करता येतील का, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा करण्याच आश्वासन त्यांनी दिलं. प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल का, यासाठी प्रयत्न करु, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

तसेच, शिक्षकांची बदली झाली नाही तर एक शिक्षकांमध्ये जबाबदारीची जाणीव असते. पण जर एखादा शिक्षक अजिबात चांगलं शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग दिली जाईल, असंही केसरकरांनी यावेळी नमुद केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com