कोश्यारींचे सारचं किळसवाणं ; काय ते हातवारे, काय ते हसणं ; कॉंग्रेसनं उडवली खिल्ली

कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव!, असे टि्वट काँग्रेसने केले आहे.
governor bhagat singh koshyari
governor bhagat singh koshyarisarkarnama

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी एकच गदारोळ केला.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj)आणि सावित्रीबाईं फुले (savitribai phule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्ताधारी पक्ष चांगलाच आक्रमक झाला. कोश्यारीनी (governor bhagat singh koshyari)आपल्या अभिभाषणाला सुरवात केल्यानंतर सभागृहात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

governor bhagat singh koshyari
OBC : आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ; छगन भूजबळ ठाम

कॉग्रेसने कोश्यारींवर टीका केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते, अशी खोचक टीका काँग्रेसने केली आहे. शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या कोश्यारीवर कॉग्रेसने हल्लाबोल केला आहे.

governor bhagat singh koshyari
मुंबईकरांसाठी संजय पांडेंनी शेअर केला वैयक्तिक मोबाईल नंबर

''काय ते हातवारे, काय ते हसणं…सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव!, असे टि्वट काँग्रेसने केले आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी..

पुणे..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात पुण्यात १४ फेब्रुवारी रोजी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं लग्न १० व्या वर्षी झालं होतं. तेव्हा त्यांच्या पतीचं वय १३ वर्ष होतं. त्यामुळे कल्पना करा की, इतक्या लहान वयात एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर काय विचार करत असतील?, एका प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे. तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं होतं. त्याच संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

औरंगाबाद..

सावित्रीबाई फुलेंच्या वक्तव्यानंतर कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये २७ फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. ''चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात रविवारी केले. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj)यांच्याविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com