राज्यपाल कोश्यारींना परत पाठविण्याचा कॉग्रेस ठराव आणणार

कोश्यारी यांना परत पाठविण्याबाबत विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करु, असे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी माध्यमांना सांगितले.
bhagat singh koshyari, Nana Patole
bhagat singh koshyari, Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari)यांनी शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले (savitribai fule) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कॉग्रेसने कोश्यारी यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठविण्याबाबत विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करु, असे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी माध्यमांना सांगितले.

नाना पटोले म्हणाले, ''विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले, हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करु, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारी व भारतीय जनता पक्षाला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीबाई यांच्याबाबत कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो,''

मंत्री नबाव मलिक यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पटोले म्हणाले, ''नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांचा राजीनामा मागण्याचा भाजपाला अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील डझनभर मंत्र्यांवर आरोप झाले, त्यावेळी फडणवीस यांनी किती मंत्र्यांचे राजीनामे घेतले? याचे उत्तर द्यावे. सर्वांना क्लिनचिट दिली होती. मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीने पक्षाला दिलेला देणगीचा पैसा कसा चालतो? इक्बाल मिर्ची भाजपाचा नातेवाईक आहे का?''

bhagat singh koshyari, Nana Patole
कोश्यारींचे सारचं किळसवाणं ; काय ते हातवारे, काय ते हसणं ; कॉंग्रेसनं उडवली खिल्ली

''विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. हे अधिवेशन पूर्णवेळ चालेल परंतु भाजपा जाणीवपूर्वक गोंधळ घालून त्यात अडथळे आणत असेल तर त्यांना जनता माफ करणार नाही,'' असेही पटोले म्हणाले.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी एकच गदारोळ केला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईं फुले यांच्या लग्नाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्ताधारी पक्ष चांगलाच आक्रमक झाला. कोश्यारींनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केल्यानंतर सभागृहात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

कॉग्रेसने कोश्यारींवर टीका केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते, अशी खोचक टीका काँग्रेसने केली आहे. शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या कोश्यारीवर कॉग्रेसने हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com