Dada Bhuse News : ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदा ;दादा भुसेंचा अद्वय हिरेंवर हल्लाबोल

Dada Bhuse News : मालेगावात दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Dada Bhuse News :
Dada Bhuse News :sarkarnama

Dada Bhuse News : शिंदे गटात गेलेले नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (dada bhuse) यांना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला आहे.नाशिकमधील भाजप युवा मोर्च्याचे नेते डॉ.अद्वय हिरे (avaday hire) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. डॉ.अद्वय हिरे यांच्यासोबत मालेगावमधील हजारो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश हा दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याचे बोललं जाते. यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मालेगावात दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Dada Bhuse News :
Tipu Sultan Garden Row: 'मविआ' ला सरकारचा दणका ; "मालाडच्या गार्डनचं नावं.."

हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाबाबत दादा भुसे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटलेल्या अद्वय हिरे यांना दादा भुसे चिमटा काढला आहे.

"गेल्या घरी सुखी राहा, ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदावे’" अशा शब्दात दादा भुसे यांनी हिरेंची खिल्ली उठवली आहे. सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी फुट पाडल्यानंतर दादा भुसे यांच्यावर अद्वय हिरे यांनी समाज माध्यमांवर टीका केली होती.

आता हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर भुसे समर्थक टीका करू लागले आहे. अद्वय हिरे यांच्या सोशल मीडियावरील शिवसेनेच्या विरोधातील पोस्ट आणि मिम्स व्हायरल केल्या जात आहे. त्यातच दादा भुसे यांनी आज दिलेली खोचक प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

ठाकरे गटात बंड करून दादा भुसे शिंदे गटात गेल्यामुळे नाशिकमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याचाच फायदा डॉ. हिरे यांना होणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com