BJP News: भाजप मंत्र्यांसाठी RSSचा ‘क्लास’; मोदींनंतर संघानं दिला 'कानमंत्र'; जबाबदारी, अपेक्षा...

RSS Guidance For BJP Ministers: आदिवासी विकास, कामगार, उच्च व तंत्रशिक्षण ,पशुसंवर्धन, ग्रामविकास , वनविभागाशी संबंधित विषयांवर विशेषत्वाने संघाची भूमिका आणि अपेक्षा काय आहे, याबाबतची माहिती मंत्र्यांनी देण्यात आली. याबाबत मंत्र्यांना अवगत केले जाईल,” अशी माहिती आहे.
RSS Guidance For BJP Ministers
RSS Guidance For BJP MinistersSarkarnama
Published on
Updated on

Mumbai 20 Jan 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीत भाजप मंत्र्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, याबाबत कानमंत्र दिला होता. आता दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने (RSS) मुंबईत भाजपच्या मंत्र्यांना मार्गदर्शन करीत काही सूचना केल्या आहेत.

मुंबईतील दोन दिवस चालेल्या शिबिरात आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप मंत्र्याचं 'बौद्धीक' घेतलं. यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, आकाश फुंडकर, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, पंकज भोयर आदी उपस्थित होते.

RSS Guidance For BJP Ministers
Akshay Shinde Encounter: धक्कादायक: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक; 5 पोलिस अडचणीत, कोर्टाच्या अहवालात काय म्हटलंय?

राज्य चालविताना कारभार करा करायचा, याबाबत मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या. मंत्री म्हणून काय अपेक्षा आहे, याबाबत संघाकडून मंत्र्यांना त्यांच्या कामाची, कर्तव्य, जबाबदारीची आठवण करुन दिली. संघाचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजप मंत्र्यांना मार्गदर्शन केले. आपल्या विचारांना प्राधान्य द्या, गतिमान कारभार करा असा सल्ला यावेळी भाजप मंत्र्यांना संघाकडून देण्यात आला.

आदिवासी विकास, कामगार, उच्च व तंत्रशिक्षण ,पशुसंवर्धन, ग्रामविकास , वनविभागाशी संबंधित विषयांवर विशेषत्वाने संघाची भूमिका आणि अपेक्षा काय आहे, याबाबतची माहिती मंत्र्यांनी देण्यात आली. याबाबत मंत्र्यांना अवगत केले जाईल,” अशी माहिती आहे.

RSS Guidance For BJP Ministers
Trupti Desai: धनूभाऊ, कार्यकर्त्यांना आवरा, नाहीतर परळीत येऊन...; तृप्ती देसाई संतापल्या

लोकसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघाचे पदाधिकाऱ्यांनी प्रचारात सहभाग घेत भाजपच्या उमेदवारांना बुस्टर डोस दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचे मानले जाते, महायुतीच्या विजयात संघाचा मोठा वाटा असल्याचे बोललं जाते. याचं पार्श्वभूमीवर संघाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मंत्र्यांचे 'बौध्दीक'घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com