Gunratna Sadavarte : एसटीचा संप सुरू होताच सदावर्ते 'अ‍ॅक्टिव्ह'; 'ठाकरे- पवारांकडे वळवला मोर्चा

ST Strike News : सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर,तर कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह गुणरत्न सदावर्तेही आता पुन्हा एकदा एसटी आंदोलनात सक्रिय झाले आहेत.त्यामुळे महायुती सरकारच्या काळात पुन्हा एकदा एसटी कर्मचार्‍यांचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. याचदरम्यान,महाराष्ट्रात आरक्षणावरुन मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे.राजकीय पक्षांच्या बैठका, मेळावे,यात्रा,दौरे, इन्कमिंग- आऊटगोईंग यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

तर दुसरीकडे ऐन विधानसभा,गणेशोत्सवाच्या तोंडावरच एसटी कामगारांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या सरकारपुढे आता एसटीच्या संपामुळे (ST Strike) नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

याचवेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटीचं आंदोलन गाजवणारे गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी एसटी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.

सदावर्ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारी ही माणसं आहेत.सध्या जे आंदोलन सुरू आहे,ते राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे.एसटी कर्मचारी यांच्या संपात महाविकास आघाडीचा हात आहे आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं असल्याचा आरोप केला आहे. तसेच आम्ही एसटी गावा-गावांपर्यंत पोहोचवू असं विधान केलेल्या खासदार सुप्रिया सुळेंवरही टीकेची झोड उठवली आहे.

Gunaratna Sadavarte
Ramdas Athawale : आठवलेंनी आजचं मरण उद्यावर ढकललं; गटबाजीवर 'असा' काढला तोडगा

एका वृत्तवाहिनीशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं असल्याचा आरोप केला आहे. तसेच आम्ही एसटी गावा-गावांपर्यंत पोहोचवू असं विधान केलेल्या खासदार सुप्रिया सुळेंवरही टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, 124 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या,तेव्हा सुळे कुठे होत्या? तेव्हा त्या संसदेत का बोलल्या नाहीत? तेव्हा शरद पवार शांत का होते? मुळात ही जबाबदारी न स्वीकारणारी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारी माणसं असल्याचा हल्लाबोलही सदावर्ते यांनी केला.

सदावर्ते म्हणाले, महाविकास आघाडी,शरद पवार (Sharad Pawar),उद्धव ठाकरेंशी संबंधित लोकं आंदोलन करत आहेत. काही बोटावर मोजण्याइतपत आणि एसटीमधून निलंबित करण्यात आलेली लोकं आंदोलनात सहभागी झाले. नोकरीवर असताना प्रदीर्घ काळ रजा घेऊन मजा मारणारी ही लोकं असल्याची खरमरीत टीका केली.

Gunaratna Sadavarte
Sujay Vikhe Vs Vivek Kolhe : 'कोणीही आलं, तर त्याचं स्वागत'; सुजयदादाचं विवेकभैय्यांना आव्हान

एसटी कामगारांच्या आंदोलन आणि संपावर सरकारकडून लवकर तोडगा काढण्यात आला नाही तर प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे.सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर,तर कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह गुणरत्न सदावर्तेही आता पुन्हा एकदा एसटी आंदोलनात सक्रिय झाले आहेत.त्यामुळे महायुती सरकारच्या काळात पुन्हा एकदा एसटी कर्मचार्‍यांचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com