Gunratna Sadavarte : फडणवीसांनी केलेल्या 'अडकवण्याचा' आरोपाबाबत, सदावर्तेंनी केला मोठा दावा!

Gunratna Sadavarte : नागपूर RSS आणि फडणवीसांबाबत प्रश्न विचारले.
Gunrtana Sadavarte
Gunrtana Sadavarte Sarkarnama

Gunratna Sadavarte : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात माझी अटक घडवून,मला अडकवण्याचा प्लॅन होता, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला, अन् राज्याचा राजकारणात एकच घमासान सुरू झाले. आता फडणवीसांच्या या दाव्याला, अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा दुजोरा मिळताना दिसत आहे.

Gunrtana Sadavarte
SM Nasar News : हे वागणं बरं नव्हं..; मंत्र्यानेच कार्यकर्त्यावर..; 'हा' VIDEO पाहाच

महाविकास आघाडीच्या मलाही अडकवण्याचा च्यांचा डाव होता. मी एस.टी कामगारांची बाजू घेतल्याने मलाही अटक करून, अडकवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. पोलिस चौकशीतही माझ्याकडून आणखी खूप काही वदवून घेण्याचा तयारीत होते, असा आरोप सदावर्ते यांनी केलाय. त्याप्रमाणेच फडणवीस यांनाही अडकवण्याचा मागील सरकारचा कट होता.

Gunrtana Sadavarte
Indapur NCP : इंदापुरात राष्ट्रवादीला धक्का ; वरिष्ठ नेत्याने धरला शिंदे गटाचा रस्ता

नागपूर RSS आणि फडणवीस :

एस टी आंदोलनाच्या वेळी मला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी डीसीपी निलोत्पल यांनी मला चौकशीसाठी बोलवले होते. रात्री चौकशीसाठी त्यांनी मला बोलावलं.

मला चौकशीदरम्यान नागपूर, राष्ट्रीय स्वंयमसेवक संघ आणि फडणवीस यांच्या भेटीगाठीबद्दल मला प्रश्न विचारण्यात येत होते, असे सदावर्ते म्हणाले. त्यांना काहीही करून, माझ्या तोंडातून उलटसुलट वदवून घ्यायचं होतं, हा त्यावेळील सरकारने कट रचला होता, असा सदावर्ते यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com