Indapur NCP : इंदापुरात राष्ट्रवादीला धक्का ; वरिष्ठ नेत्याने धरला शिंदे गटाचा रस्ता

माजी मंत्री विजय शिवतारे व इंदापूर तालुका  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष महारुद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एक बैठक झाली आहे.
Maharudra Patil
Maharudra PatilSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : एकेकाळी इंदापूर (Indapur) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) धुरा सांभाळलेले तसेच बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे अत्यंत विश्वासू, निष्ठावंत सहकारी म्हणून ओळख असणारे महारुद्र पाटील (Maharudra Patil) व त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. (Former taluka president of NCP Indapur Maharudra Patil will join Shinde group)

महारूद्र पाटील यांच्या रुपाने बाळासाहेबांच्या शिवसेनेने इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला झटका दिला आहे. आगामी काळात इंदापूर तालुक्यात मोठ्या राजकीय उलथापालथी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आणि काट्यावरचे राजकारण पाहता हा राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशारा समजला जात आहे.

Maharudra Patil
Daund Mass Murder Case : चिमुकल्यांचे मृतदेह पाहून अग्निशमन पथकही हेलावले

महारुद्र पाटील यांनी सहा वर्षे इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्याच कारकिर्दीत बाजार समिती, खरेदी विक्री संघ, बहुतांशी ग्रामपंचायती, सोसायटीच्या  निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामध्ये पक्षाला यश मिळाले होते. मात्र, त्यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे.

Maharudra Patil
Daund News : दौंड हादरले; एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भीमा नदीत आढळले

दरम्यान, माजी मंत्री विजय शिवतारे व इंदापूर तालुका  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष महारुद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एक बैठक झाली आहे.  यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी कोण कोण पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com