Rajuri Constituency Vote Chori : 'मतचोरी प्रकरणात एफआयआर, फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा'; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Harshvardhan Sapkal Devendra Fadnavis : कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी मतचोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी केली आहे.
Harshawardhan Sapkal Devendra Fadnavis
Harshawardhan Sapkal Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Harshvardhan Sapkal News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचे पुराव्यासह उघड केले आहे. त्यात महराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6 हजार 850 मतचोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे. त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघात मतचोरी कशी करण्यात आली? हे काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आता मतचोरीचा आणखी एक बॉम्ब राहुल गांधी यांनी फोडला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघाच्या मतदारयादीत कसा घोटाळा केला? हे आज उघड केले. निवडणूक आयोग दुटप्पीपणा करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरीवर स्पष्ट उत्तर न देता राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणे बोलत आहेत. त्यामुळे मतचोरी झाली नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे असा सल्ला सपकाळ यांनी दिला.

मतचोरी करून भाजप व नरेंद्र मोदी यांना भारताचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश करायचा आहे, असा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केला आहे. कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. व्यंकटेश, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.

Harshawardhan Sapkal Devendra Fadnavis
Rohit Pawar Vs Ram Shinde : राम शिंदे ज्या गुंडाला विधानभवनात घेऊन फिरतात..! घायवळ टोळीच्या गोळीबारानंतर रोहित पवारांनीही साधली संधी...

जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींचा विजय

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वारंवार केंद्र सरकारची पोलखोल केली असून नोटबंदी, कोरोना संकटावरही त्यांनी मोदी सरकारला धोक्याचा इशारा दिला होता पण मोदी सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली आहे. जीएसटीमध्ये सुधारणा करा, असे राहुल गांधी यांनी ८ वर्षापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि जीएसटीमध्ये त्यांना सुधारणा करावी लागली. जीएसटीमधील सुधारणा हा राहुल गांधी यांच्या दूरदृष्टी विचाराचा मोठा विजय असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस 22 सप्टेंबर रोजी राज्यभर दुकानदार, व्यापारी आस्थापने येथे पेढे वाटून साजरा करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांना सांगितले.

Harshawardhan Sapkal Devendra Fadnavis
Congress : राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वात आधी करणार 'हे' काम; त्यांनी स्वत:च सांगितलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com