Rohit Pawar Vs Ram Shinde : राम शिंदे ज्या गुंडाला विधानभवनात घेऊन फिरतात..! घायवळ टोळीच्या गोळीबारानंतर रोहित पवारांनीही साधली संधी...

Nilesh Ghaywal gang firing incident sparks outrage : कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.
"Rohit Pawar reacts strongly after reports linking Ram Shinde with a gangster following the Nilesh Ghaywal gang firing case."
"Rohit Pawar reacts strongly after reports linking Ram Shinde with a gangster following the Nilesh Ghaywal gang firing case."Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कोथरूड परिसरात काल रात्री घडलेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. घायवळ टोळीच्या गुंडांनी एकाच रात्री दोन जणांवर हल्ला करून परिसरात दहशत पसरवली. या हल्ल्यांमध्ये निलेश घायवळ टोळीचं नाव समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुण्यात बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घायवळ टोळीच्या चार गुंडांनी दोन गाड्यांवरून येत प्रकाश धुमाळ याच्यावर गोळीबार केला. "आम्ही इथले भाई आहोत," असे ओरडत त्यांनी एक गोळी फायर केली, जी धुमाळ यांच्या मांडीवर लागली. याच रात्री, त्याच टोळीने वैभव साठे याच्यावर कोयत्याने क्रूर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

दरम्यान, यापूर्वी कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. राम शिंदे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. याअनुषंगाने रोहित पवार यांनी आता थेट राम शिंदे यांना टार्गेट केले आहे.

"Rohit Pawar reacts strongly after reports linking Ram Shinde with a gangster following the Nilesh Ghaywal gang firing case."
Varsha Bungalow news : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात डबल बेड मॅट्रेस, सोफ्यासाठी 20.47 लाख खर्च? रोहित पवारांचा दावा किती खरा?

रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधानभवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात (कोथरुड) भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला जखमी केलं आहे.

"Rohit Pawar reacts strongly after reports linking Ram Shinde with a gangster following the Nilesh Ghaywal gang firing case."
Election Commission News : राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानेच केला धक्कादायक खुलासा; FIR ची दिली माहिती...

आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या गुंडाच्या टोळीवर काय कारवाई करतात की हा गुंड विधानपरिषदेच्या सभापती महोदयांचा खास माणूस आहे, म्हणून त्याला हमखास पाठीशी घालतात, हेच पहायचंय! या कारवाईनंतर हे सरकार सामान्य माणसाचं आहे की गुंडांचं हे कळणार आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com