नगरविकास खाते असतांना निधी कमी पडू दिला नाही..आता तर शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत...

Shrikant Shinde : 150 फुटी तिरंग्याचे खासदार डॉ. शिंदे व केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
MP Shrikant Shinde Latest News
MP Shrikant Shinde Latest NewsSarkarnama

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील रस्त्यांची कामे सुरु आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पालकमंत्री होते, नगरविकास खाते त्यांच्याकडे होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही निधीची कमतरता पडू दिली नाही. आता शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले आहेत, अजून चांगली कामे या मतदार संघात येतील. या विकास कामांसाठी अधिक पटीने निधी देखील येऊन येथील दळणवळणाची समस्या कायमची मिटेल,असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी डोंबिवली येथे व्यक्त केला. (MP Shrikant Shinde Latest News)

MP Shrikant Shinde Latest News
मुनगंटीवारांच्या 'वंदे मातरम्' बोलण्याच्या घोषणेबाबत अजितदादा सभागृहात प्रश्न विचारणार

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर येथील स्वातंत्र्यसेनानी स्मृती स्थळाजवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. शिंदे समर्थक माजी नगरसेवक राजेश मोरे व भारती मोरे यांच्यावतीने आयोजित या सोहळ्यात 150 फुटी तिरंग्याचे खासदार डॉ. शिंदे व केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हर घर तिरंगा या केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दोन्ही प्रभागात सुमारे 5 हजार तिरंग्याचे वाटप करण्यात आले होते. प्रभागात तिरंग्याची विद्युत रोषणाई करत सजविण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनी सकाळी ध्वजवंदन कार्यक्रमासाठी हजारो डोंबिवलीकरांनी याठिकाणी गर्दी केली होती. पोलिस प्रशासन, पालिका अधिकारी, माजी नगरसेवकांची उपस्थिती सोहळ्यास होती. यावेळी बोलताना खासदार डॉ. शिंदे बोलत होते.

MP Shrikant Shinde Latest News
सावंतांना निंबाळकर अन् कैलास पाटलांशी संघर्ष करून आरोग्यसेवेचा शिवधनुष्य पेलावा लागणार

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली, याविषयी बोलताना ते म्हणाले, कल्याण लोकसभा मतदार संघातील दळणवळणाची समस्या सुटावी यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. कल्याण शीळ रोडचे सहापदरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील रस्ते, शहरांतर्गत रस्ते यासाठी एमएसआरडीसीकडून निधी मंजुर करत निविदा प्रक्रीया पार पडली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर ही कामे सुरु होतील. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कल्याण शीळ रोडवरील जे कोंडीची ठिकाण आहेत त्यांचे उन्नतीकरण करणे यांसारखी कामे सुरु आहेत.

कल्याण ते तळोजा मेट्रो 12 च्या कामाविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून या कामासही गती मिळणार आहे. बीएसयुपी घरांविषयी पालिकेला अदा करावे लागणारे शासनाचे पैसे माफ करण्याचे निर्देश शासनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार लवकरच प्रकल्प बाधितांना बीएसयुपीची घरे वितरीत केली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com