सावंतांना निंबाळकर अन् कैलास पाटलांशी संघर्ष करून आरोग्यसेवेचा शिवधनुष्य पेलावा लागणार

Tanaji Sawant: सावंत यांच्या बाजूने भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील स्पर्धेत उतरू शकतात.
Kailas Patil, MP Nibalkar &Tanaji Sawant  Latest News
Kailas Patil, MP Nibalkar &Tanaji Sawant Latest NewsSarkarnama

उस्मानाबाद : राज्याच्या आरोग्य सेवेची जबाबदारी निभावत मतदारसंघाकडे फिरकत नसल्याचा शिक्का नष्ट करण्याचा शिवधनुष्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना पेलावा लागणार आहे. याशिवाय जिल्ह्यासह मराठवाड्या तील ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटीची धार द्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी खासदार निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याशी संघर्ष करूनच यशस्वी वाटलाच करावी लागणार आहे. त्यात प्रा. सावंत किती यशस्वी होतात, यावरून त्यांच्या राजकारणाचे भविष्य निश्चित होणार आहे. (Kailas Patil, Tanaji Sawant Latest News)

Kailas Patil, MP Nibalkar &Tanaji Sawant  Latest News
घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान? अजित पवारांचे पंतप्रधानांना उत्तर....

रविवारी (ता. १४) झालेल्या खातेवाटपामध्ये प्रा. सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत गृहमंत्रीपदासह विविध नेत्यांना विविध जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी गृहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. याशिवाय खालीक मियाँ काझी, मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, राणाजगजितसिंह पाटील यांनीही विविध खात्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. दरम्यान उस्मानाबादसह लातूर जिल्हा एकत्रित असतानाही शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम केले. आता सावंत यांच्या रुपाने जिल्ह्याला सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मिळाले आहे.

कोरोनाच्या काळात शासकीय आरोग्य यंत्रणेचे महत्व अनेकांना समजले आहे. त्या सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी आता सावंत यांच्याकडे आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा यामुळे आरोग्यसेवा मोडखळीस येत आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या इमारती, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने दुरावस्थेत आहेत. त्याला बळकटी देऊन ग्रामीण आरोग्य सक्षम करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

विरोधकांचा सामना करावा लागणार

गेली अडीच वर्षे प्रा. सावंत यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे ते वारंवार महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त करीत होते. या नाराजीमुळे ते मतदारसंघातही (परंडा विधानसभा) फिरकले नसल्याचा आरोप मतदारांतून केला जात आहे. तर जिल्ह्यातील विविध विकास कामातही ते फारसे दिसत नव्हते. जिल्ह्यासह मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. मात्र विकासासाठी मतदारसंघात यावेच लागते असे होत नाही, असे खडे बोल त्यांनी विरोधकांना बोलून दाखविले होते. तर काम करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होते, असे त्यांचे समर्थक बोलत होते. आता अडीच वर्षानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यांना मतदारसंघाची जबाबदारी तर आहेच, पण राज्याच्या आरोग्याचा डोलारा सांभाळावा लागणार आहे. राज्यात लक्ष देऊन मतदारसंघातही विकासकामे करावी लागणार आहेत.

Kailas Patil, MP Nibalkar &Tanaji Sawant  Latest News
मोठी बातमी : अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

येणाऱ्या अडीच वर्षात जिल्ह्यासह मतदारसंघात विकासाचा रथ वेगाने पळवावा लागणार आहे. यापूर्वी एकाच पक्षात असणारे खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील त्यांचे प्रतिस्पर्धी झाले आहेत. शिवसेना फुटाफुटीत प्रा. सावंत एका तर कैलास पाटील दुसऱ्या बाजूने गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यातील संघर्ष उफाळून येऊ शकतो. कारखानादारी आणि ऊस गाळपाच्या मुद्यावरून प्रा. सावंत हे खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांना खिंडीत पकडणार का? राज्याच्या आरोग्याचा रथ सांभाळताना शिवसेनेचा गट (उद्धव ठाकरे समर्थक) प्रा. सावंत यांच्या

कार्याची प्रत्येक टप्प्यावर परिक्षा घेणार की त्यांच्याशी जूळवून घेणार, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष असणार आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात प्रा. सावंत यांच्या बाजूने भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील स्पर्धेत उतरू शकतात. तर खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे त्रिकुट सावंतांच्या वर्चस्वाचा कसा सामना करणार, याकडे जिल्ह्यातील पुढाऱ्यांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com