Rebel Political Party : पक्षातून फुटलेल्यांना आता चपराक बसणार; मुंबई हायकोर्टातील याचिकेवर लवकरच सुनावणी

Minakshi Menon Petition On Schedule 10 : शेड्यूल १० चे उल्लंघन होत असल्याने दुरुस्तीची मागणी
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama

Mumbai Political News : देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षात फूट पडली आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यात जे पक्षातून फुटले आहेत, किंवा फुटतात त्यांना पदावरून तात्काळ दूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात अली आहे. याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होऊन अशा प्रकारांना चाप बसण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

महाराष्ट्रात पक्षात बंडखोरी करून फुटील गटाकडून मूळ पक्ष आपलाच असल्याचा दावा करण्याचे प्रकार वाढले आहेत. पक्षातून फुटल्यावर दुसऱ्या पक्षात जाणे आवश्यक आहे. याबाबत विधानसभा अध्यक्षही निर्णय घेत नाहीत. हा प्रकार म्हणजे 'शेड्युल १०'चे उल्लंघन करणारा असल्याचे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी मेनन यांनी यावर आळा बसण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय घटनेच्या शेड्युल १० चा पॅरा क्रमांक चार हटवण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावर लवकरच मुंबई हायकोर्टातील जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Telgi Fake Stamp Scam: राष्ट्रवादी फुटली अन् स्टॅम्प घोटाळ्याची पुन्हा राळ उठली; काय आहे 'तेलगी' प्रकरण?

देश पातळीवर अनेक राजकीय पक्षात फूट पडत असते. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष फुटीच्या घटना घडल्या आहेत. प्रथम शिवसेना पक्षात फूट पडली. शिवसेनेचे ४० आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यांचे ही जवळपास ४० आमदार फुटले आहेत.

नियमानुसार पक्षातून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणे आवश्यक आहे. मात्र पक्ष फोडून त्यावर दावा सांगण्याचे प्रकार राज्यात घडले आहेत. परिणामी शेड्युल १० चे उल्लंघन होत आहे. यामुळे एखाद्या फुटीबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नसतील तर महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींना त्या पदावरून दूर करावे, अशी ही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर मेनन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Bihar Caste Survey : बिहारमधील जातीय जनगणाना; सुप्रीम कोर्टात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र केंद्राने घेतले मागे

देशात पक्षांतर बंदी कायदा आहे. मात्र, या कायद्याच शेड्युल १० चे मुद्दा क्रमांक ४ हे पक्षांतरास प्रोत्साहन देणार कलम आहे. त्यामुळे हे कलम रद्द करावे, अशी याचिकेत मागणी केली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असून यावर काय निर्णय घेण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com