IPL:मनसे-ठाकरे सामना रंगणार ; शिवसेनेची भूमिका कधीच भूमिपुत्रांबाबत नव्हती..

स्थानिकांना काम मिळणार नसतील तर स्पर्धा मुंबईत भरवण्याचा खटाटोप का केला जातोय,'' असा प्रश्न देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.
Sandeep Deshpande, Aaditya Thackeray
Sandeep Deshpande, Aaditya Thackeraysarkarnama

मुंबई : आयपीएलवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांच्यात जुंपली आहे. देशपांडेंनी टि्वट करीत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (MNS activists vandalize buses transporting IPL players)

''आयपीएल संदर्भातील स्थानिकांना काम मिळणार नसतील तर स्पर्धा मुंबईत भरवण्याचा खटाटोप का केला जातोय,'' असा प्रश्न देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

''महाराष्ट्रात आयपीएल (IPL)झाल्या तर राज्याचे अर्थचक्र फिरेल, असे सरकार कसे सांगू शकते. महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना काम न देता परराज्यातील कंत्राटदारांना काम देता मग भूमिपुत्रांना न्याय कसा देणार, शिवसेनेची भूमिका कधीच भूमिपुत्रांबाबत नव्हती, आम्ही भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष करणार,'' असा इशारा देशपांडेंनी टि्वटमधून दिला आहे.

''महाराष्ट्रामध्ये ipl चे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच?? असे त्यांनी म्हटलं आहे.

आयपीएल’च्या हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे.

Sandeep Deshpande, Aaditya Thackeray
धक्कादायक : उमेदवाराच्या पराभवामुळे सपाच्या कार्यकर्त्याची आत्महत्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेने मंगळवारी रात्री आयपीएलच्या बसची तोडफोड केली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉल्वो बसच्या व्यवस्थापनाचं काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री या बसची तोडफोड केली. ताज हॉटेलबाहेर असणारी ही बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर या प्रकरणावरुन आता मनसे आणि आदित्य ठाकरे असा सामना रंगला आहे.

आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतुकीसाठी ज्या बस वापरल्या जातात त्या बस महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या जातात. राज्यातील बस वाहतूकदारांना किंवा स्थानिक व्यावसायिकांना हे काम दिले जात नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूकीच्या व्यवस्थेचं काम देण्याची मागणी मनसेकडून लावून धरण्यात आली होती. मात्र वारंवार मागणी करुनही खेळाडूंच्या वाहतुकीचे काम बाहेरच्या व्यायसायिकांना दिलेे जात होते. या विरोधात मंगळवारी मनसेने आक्रमक पवित्रा घेत बस फोडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com