Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Eknath Shinde : कोणत्या अधिकारात कारवाई रोखली? हायकोर्टाची एकनाथ शिंदेंना विचारणा; अनधिकृत इमारत प्रकरण भोवणार?

Eknath Shinde Mumbai High Court : नवी मुंबईतील बेकायदा इमरतींना बजावलेल्या नोटीसीला एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. आता याची दखल मुंबई हायकोर्टाने घेत शिंदेंना प्रश्न विचारले आहेत.
Published on

Eknath Shinde News : नवी मुंबई महापालिकेने वाशीतील 14 मजली नैवैद्य इमारतीला अनधिकृत ठरवत कारवाईसाठी नोटीस दिली होती. या इमारतीसह आणखी एका इमारतीला महापालिकेने नोटीस बजावली होती. मात्र, कारवाई न करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, या विरोधात एका सामाजिक संस्थेकडून हायकोर्टात धाव घेण्यात आली होती.

हायकोर्टाने या कथित अनधिकृत इमारतीवर कारवाई रोखण्यासाठी निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात दिले? अशी विचारणा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांना महापालिकेने अनधिकृत ठरवलेल्या इमारतीवरील कारवाई रोखण्याचे अधिकार आहेत का? असा विचारणा देखील कोर्टाने केली आहे.

14 मजली नवैद्य आणि सात मजली अलबेला यांच्यावरील कारवाईची नोटीस कोणत्या अधिकाराखाली रोखल्या असा सवाल कोर्टाने केला आहे. सामाजिक संस्थेकडून करण्यात आलेल्या याचिकेमध्ये या दोनही बेकायदा इमारती पाडण्याची विनंती करण्यात आली आहे.

वाशीममधील सेक्टर 9 मध्ये असलेल्या या दोनही इमारती महापालिकेने बेकायदा ठरवता कारवाईचा बडगा उचलला होता. त्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या कारवाईला स्थगिती दिली होती. दरम्यान कोर्टाने शिंदेंच्या अधिकाराबाबत विचारणा करताना पुढील सुनावणीत याचिकेबाबत महत्त्वाचा निर्णय देण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक

आगामी महापालिका निवडणुकीत नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध मंत्री गणेश नाईक यांच्यात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. नाईक यांनी ठाण्यात जात नवी मुंबईत जशी आपण स्वबळावर सत्ता आणली तशी ठाण्यात देखील आणू शकतो, असा इशारा दिला होता. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नाईक विरुद्ध शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com