Jay Siddheshwar Swami : जात प्रमाणपत्र प्रकरणी भाजपच्या खासदाराला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा ; काय आहे प्रकरण ?

MP Jay Siddheshwar Swami Issue : सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश समितीला दिले.
MP Jay Siddheshwar Swami Issue
MP Jay Siddheshwar Swami Issue Sarkarnama
Published on
Updated on

Solapur : सोलापुरचे भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या नावे दिलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द करण्याचा पडताळणी समितीचा आदेश उच्च न्यायालयाने नुकताच रद्ध केला आहे. (MP Jay Siddheshwar Swami Issue)

MP Jay Siddheshwar Swami Issue
Praja Foundation Report : भाजपची कामगिरी घसरली..; शिंदे, ठाकरे गटातील आमदारांचे प्रगती पुस्तक हाती

न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायामूर्ती राजेश पाटीव यांच्या खंडपीठाने हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी पुन्हा समितीकडे पाठवले. याप्रकरणी सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश समितीला दिले.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत प्रक्रियेला समितीने बगल देऊन जयसिद्धेश्वर यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले व ते रद्द केले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.

MP Jay Siddheshwar Swami Issue
MNS Campaign Ek Sahi Santapachi : 'मनसे' च्या 'संतापा' वर राष्ट्रवादी-शिवसेनेची स्वाक्षरी ; राजकीय घडामोडींबाबत राग..

२०१९ च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते.

काय आहे प्रकरण..

सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com