Praja Foundation Report : भाजपची कामगिरी घसरली..; शिंदे, ठाकरे गटातील आमदारांचे प्रगती पुस्तक हाती

Maharashtra Legislative Session : ठाकरे गटातील आमदारांनी आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.
 Maharashtra Legislative Session
Maharashtra Legislative SessionSarkarnama
Published on
Updated on

Praja Foundation Report : मुंबईतील विद्यमान आमदारांनी त्यांच्या दोन वर्षातील संविधानात्मक आणि वैधानिक कर्तव्यांची पूर्तता कशी केली, यांचे मूल्यमापन प्रजा फाऊंडेशनने प्रगती पुस्तकातून केले आहे. ‘मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक 2023’ नुकतेच प्रकाशित केले आहे. अधिवेशन कालावधीत आमदारांच्या कामगिरीबाबतचा हा अहवाल आहे. (praja foundation report maharashtra legislative session)

या अहवालात भाजपच्या आमदारांची कामगिरी घसरली असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे काही आमदार पिछाडीवर पडले आहेत तर ठाकरे गटातील आमदारांनी आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. काय आहे हा अहवाल जाणून घेऊया..

आशिष शेलार पिछाडीवर

भाजपचे नेते, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे गेल्यावर्षींपेक्षा यंदा पिछाडीवर पडलेले दिसतात. शेलार हे सातव्या क्रमांकावर होते. मात्र यंदा ते नवव्या क्रमांकावर आहेत. आमदार अमित साटम यांनी आपला ४ था क्रमांक अबाधित ठेवला आहे. आमदार भारती लव्हेकर यांनी काहिशी चांगली कामगिरी करीत १३ व्या क्रमांकावरून ६ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

 Maharashtra Legislative Session
Rohit Pawar On NCP Crisis: पस्तीस वर्षे साहेबांसोबत होते ते सोडून गेले, ते नव्या नेत्यासोबत कसे राहतील ? ; रोहित पवारांचा बंडखोरांवर निशाणा

पराग शाह यांनीही १४ व्या क्रमांकावरून थेट ५ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. आमदार मिहीर कोटेचा यांनीही १५ व्या क्रमांकावरून थेट ११ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.योगेश सागर हे १० व्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर घसरले आहेत. योगेश सागर हे १० व्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर घसरले आहेत.

कालिदास कोळंबकर हे १२ व्या क्रमांकावरून २० व्या क्रमांकावर आले आहेत. पराग आळवणी हे दुसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. भाजपचे आमदार तमिळ सेलवन हे गतवर्षी ११ व्या क्रमांकावर होते ते एकने घसरून १२ क्रमांकावर घसरले आहेत.अतुल भातखळकर हे पाचव्या क्रमांकावर होते ते थेट १७ व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

शिंदे गटातील आमदारांचे स्थान..

  • आमदार सदा सरवणकर हे २१ व्या क्रमांकावरून २८ व्या क्रमांकावर घसरले आहेत.

  • आमदार मंगेश कुडाळकर ९ व्या क्रमांकावरून १३ व्या क्रमांकावर घसरले आहेत.

  • दिलीप लांडे यांची कामगिरी २३ व्या क्रमांकावरून २७ व्या क्रमांकवर घसरली आहे.

  • आमदार प्रकाश सुर्वे ३० व्या क्रमांकावरून थेट २५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

 Maharashtra Legislative Session
Praja Foundation Report : काँग्रेसनं बाजी मारली, अमिन पटेल प्रथम ; सुनील प्रभू दुसरे तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर ; सविस्तर जाणून घ्या

अशी आहे ठाकरे गटाची आमदारांची कामगिरी

  • संजय पोतनीस यांनी प्रगती करीत २२ व्या क्रमांकावरून २१ क्रमांकावर झेप घेतली आहे.

  • अजय चौधरी यांनी, २४ व्या क्रमांकावरून थेट १९ व्या क्रमांकावर झेप घेत आहे.

  • सुनील राऊत यांची २० व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

  • आमदार सुनील प्रभू यांनी तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर भरारी घेतली आहे.

  • रवींद्र वायकर यांनी, ३१ व्या क्रमांकावरून थेट २२ व्या क्रमांकावर आहेत.

  • रमेश कोरगावकर यांनी २६ व्या क्रमांकावरून २४ व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com