वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य; फडणवीसांच्या बॉम्बवर टाकणार 'पाणी'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडीवर पेन ड्राईव बॉम्ब टाकला.
Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
Dilip Walse Patil, Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) बॉम्ब टाकला. भाजप (BJP) नेत्यांना विविध गुन्ह्यांत अडकविण्यासाठी सरकारी वकीलच षडयंत्र रचत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांनी पेन ड्राईव सादर केले. वकिलांच्या संभाषणाच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप विधानसभेत (Assembly Session) सादर करत फडणवीसांनी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. फडणवीसांच्या या आरोपांना आता सरकारकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) उत्तर देणार आहेत.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर आजचा दिवस फडणवीसांचे आरोप आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यावरून गाजणार असल्याचे स्पष्ट होते. पण मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीसांसह सर्व आमदार, नेते या मोर्चात होते. त्यामुळे सभागृहात वळसेपाटील यांना फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर देता आलं नाही.

Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
मोदींच्याच मतदारसंघात ईव्हीएमबाबत झालेल्या चुकीची आयुक्तांनीच दिली कबुली

याबाबत बोलताना वळसे पाटील यांनी मात्र मोठं वक्तव्य करत उत्सुकता वाढवली आहे. ते म्हणाले, कालच्या व्हिडीओ बाबत उत्तरसाठी मी आज तयार होतो. पण विरोधीपक्ष नेते सभागृहात उपस्थितीत नाहीत. उद्या उतर द्यावे देण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती विधान सभा अदयक्षांना केली. त्यामुळे विनंती मान्य करून उदया सभागृहान मी माहीती देणार आहे. तेव्हा माझ्या उत्तरानंतर 'दुध का दुध, पाणी का पाणी हो जायेगा', असं वक्तव्य वळसे पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपांनंतर मंगळवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचे समजते. या आरोपांवर सभागृहात कोणती भूमिका घ्यायची, याबाबत चर्चा झाली. या बैठकीला गृहमंत्री वळसे पाटील हेही उपस्थित होते. फडणवीसांच्या आरोपांवर बोलताना गृह राज्यमंत्री सतेश पाटील म्हणाले, विरोधापक्ष नेते म्हणून त्यांनी सांगितलेल्या माहितीची दखल घेतली जाईल. वेगवेगळ्या नेत्यांची नावे टाकून यापूर्वीही आरोप झालेले आहेत. बोट दाखवताना हाताची चार बोटं आपल्याकडे आहेत, हे विसरू नये. आम्हीही विरोधात होतो. त्यावेळीही आम्ही लेखी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे सादर केले आहेत. या गोष्टीची सत्यता पडताळून गृहमंत्री उत्तर देतील.

Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
निकाल लागला! निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण; भाजपचा एकहाती विजय

फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे -

सकल मराठा शिक्षण मंडळाच्या वादात भोईटे गटाच्या वतीने गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक यांनी पाटील गटाला किडनॅप केले, अशी खोटी केस केली. गिरीश महाजन यांना मोक्का लागला पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. विरोधकांची कत्तल कशी करायचे याचे षड्यंत्र आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण हे आहेत. कथा खूप मोठी आहे त्यामुळे 25 ते 30 वेब सिरीज होतील. मी जी कथा सांगत आहेत ती सत्य आहे. ज्याचे व्हिडीओ मी दिलेत. या सरकारी वकिलाचे कार्यालय आहे त्यामध्ये नियोजन केले जाते. गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकील करतो. यात एक मंत्री देखील आहे. अनिल देशमुख असते तर फायदा झाला असता, असे या व्हिडिओमध्ये आहे. अजित पवार सपोर्ट करत नाही पण बडे साहब सब देखते है असे देखील व्हिडीओ आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com