समीर वानखेडे प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले...

अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिक यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama

मुंबई : आर्यन खान प्रकरणाला रोज नव वळण मिळत आहे. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांच्या आरोपांमुळे एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे (Sameer Wankhede) अडचणीत आले आहेत. साईल यांनी केलेल्या मागणीनुसार पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) स्पष्ट केले आहे.

वळसे पाटील म्हणाले, प्रभाकर साईल यांनी संरक्षण मागितले होते. त्यांना पोलीसांना संरक्षण दिले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिक यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. मात्र, मलिक आणि माझी भेट झालेली नाही. त्यांची भेट घेतल्यानंतर चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी या विषयावर जुजबी चर्चा झाली. दुसर्‍या विषयाबाबत बैठक होती. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर आता मोठ्या प्रमाणात होत आहे. तो एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच झाला नव्हता. सरकारला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. त्याबाबत मी माझी भूमिका मांडली आहे. प्रभाकर साईलने पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल. त्यानंतर कारवाई करता येईल. राजकीय व्यक्तीवर कारवाई करण्याचे प्रमाण आधीपेक्षा वाढले आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

Dilip Walse Patil
हिंदू की मुस्लिम? क्रांती रेडकरने तो फोटोच शेअर केला...

दरम्यान, या प्रकरणातील पंच किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याचे साईलने रविवारी ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

Dilip Walse Patil
फरार किरण गोसावी पुढे आला; म्हणाला मी समीर वानखेडेंना...

क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलण करून देत असल्याचे दिसत होते. साईल यांच्या भेटीनंतर त्यांना मुंबई पोलिस संरक्षण देणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com