Kirit Somaiya On NCP: तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते सरकारमध्ये कसे? सोमय्या म्हणतात, "मी माझं कर्तव्य पार पाडलं.."

Kirit Somaiya On Ncp : "हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली आहे, खरं हाच एक मोठा कलंक आहे."
Kirit Somayya On Ncp :
Kirit Somayya On Ncp :Sarkarnama

Mumbai News : भाजपचे नेते व भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागावर असलेले किरीट सोमय्या (kirit somayya) हे मागील काही दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमांपासून अंतर राखून आहेत. किरीट सोमय्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यांची प्रकरणे काढून ईडीकडे तक्रार दिली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात ईडीच्या कारवाया सुरू झाल्या. पण सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेतेच आता सरकारमध्ये सामील झाले आहेत. यावरून सोमय्या यांना सोशल मीडियातून काही युजर्स ट्रोल करत होते. या ट्रोलिंगवर आता सोमय्या यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

Kirit Somayya On Ncp :
Anil Parab News : किरीट सोमय्यांनी नाक घासून माफी मागावीच लागेल; अनिल परबांचा इशारा

मुंबईमध्ये माहिम रेल्वे स्थानक या ठिकाणी १७ वर्षांपूर्वी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमानंतर मीडियाशी ते बोलत होते. यावेळी माध्यमांशी संवाद सोमय्या म्हणाले, "मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे. शेवटी आता पक्षाचा निर्णय असतो. पक्षाचं विशिष्ट पद्धतीने काम करण्याचं तंत्र असतं. यांच्यावर अनेक ठिकाणी न्यायालयीन कारवाई ही सुरू झालेली आहे. या गोष्टी न्यायालयात आहेत.न्यायालयात खटले सुरू असताना त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही."

Kirit Somayya On Ncp :
Kirit Somaiya News : किरीट सोमय्यांचा 'अभ्यास' पुन्हा पाण्यात..! १२ महिन्यांत दोनदा बदलला अभ्यासक्रम...

उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका -

नागपूर येथे सभेत बोलत असताना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख नागपूरला लागलेला कलंक असा केला. यावर सोमय्या आक्रमक होत. ठाकरेंवर शाब्दीक वार केला आहे. सोमय्या म्हणाले, "वास्तविक उद्धव ठाकरे ही व्यक्ती कलंक आहे. ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली आहे, खरं हाच एक मोठा कलंक आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com