Anil Parab News : किरीट सोमय्यांनी नाक घासून माफी मागावीच लागेल; अनिल परबांचा इशारा

Kirit Somaiya : उच्च न्यायालयातील दोन प्रकरणातही निर्दोष मुक्तता होणार
Kirit Somaiya, Anil Parab
Kirit Somaiya, Anil ParabSarkarnama
Published on
Updated on

Anil Parab vs Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉटप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी मंत्री अॅड. अनिल परब यांच्याविरोधातील याचिका मागे घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याविरोधात राष्ट्रीय हरित लवाद अर्थात 'एनजीटी'मध्ये दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. मात्र, साई रिसॉर्ट प्रकरणाचा दावा मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सोमय्या यांनी ही याचिका आता मागे घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परबांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर परब यांनी सोमय्या यांच्यावर घणाघात केला आहे. ते सोमवारी (ता. २९) मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Kirit Somaiya, Anil Parab
Nana Patole On Pune Loksambha : पुणे लोकसभेची जागा काँग्रेसचीच; अजितदादांच्या दाव्यानंतर पटोलेंनी थोपटले दंड !

सोमय्या (Kirit Somaiya) हे बिनबुडाचे आरोप करतात आणि पुढे सोडून देतात. त्या माध्यमातून बदनामी करण्याचे त्यांचे धोरण असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. परब म्हणाले, "साई रिसॉर्ट प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, हे मी सुरूवातीपासून वारंवार सांगत होते. ते माझ्या मित्राचे आहे. मी त्याला जागा विकली होती. मात्र जाणूनबूजून माझ्यावर खोटे आरोप केले गेले. सोमय्या सवयीप्रमाणे बिनबुडाचे आरोप करतात. त्यानंतर अशी प्रकरणे अंगलट येतात, असे लक्षात आले की मागे घ्यायाची. ही त्यांनी नेहमीच सवय आहे."

Kirit Somaiya, Anil Parab
Dapoli Sai Resort: साई रिसॉर्ट प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या दोन पावलं मागे : परबांना मोठा दिलासा

या प्रकरणी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे परब (Anil Parab) यांनी सांगितले. ते म्हणाले, "हरित लवादामध्ये हे प्रकरण सुनावणीला आले, त्यावेळी या प्रकणात काही तथ्य नाही, त्यामुळे हे प्रकरण रद्दबातल करत असल्याचे लवादाने सांगितले. हे प्रकरण रद्द झाल्याने बदनामी होईल, हे समजल्यानंतर सोमय्या यांनी आपली याचिकाच मागे घेतली. रिसॉर्टमध्ये मी गैरव्यवहाराचे पैसे लावले, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, रिसॉर्टचे पाणी समुद्रात जाते, यावरून 'ईडी'ने आमची चौकशी केली. या प्रकरणातून गेल्या दीड वर्षांपासून माझी नाहक बदनामी केली गेली. दरम्यान, उच्च न्यायालात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. "

Kirit Somaiya, Anil Parab
Ramdas Athawale News: नागालॅंडमध्ये दोन आमदार निवडून येतात; पण महाराष्ट्रात ताकद असूनही का येत नाहीत : आठवलेंची खंत

दरम्यान, उच्च न्यायालयात असलेल्या काही याचिकाही रद्द होतील, अशी खात्री व्यक्त करीत परब यांनी सोमय्यांना माफी मागावी लागेल, असे विधान केले. परब म्हणाले, "रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाईल, असा आरोप करण्यात आला आहे. मात्र रिसॉर्ट अद्याप सुरूच झालेले नाही. जे रिसॉर्ट सुरू नाही त्याचे सांडपाणी समुद्रात जाणार कसे, असा अहवाल दिल्लीतील प्रदुषण मंडळाने, शासनाने, ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्दबादल केला आहे. हा मुख्य गुन्हा रद्द झाल्यानंतर आणखी दोन गुन्हे नोंदविले. उच्च न्यायालयातही काही याचिका आहेत. ते गुन्हे खोटे असल्याचे आम्ही सिद्ध करू. आता एकएक ठिकणाी त्यांना याचिका मागे घ्यावी लागत आहे. किंवा या याचिका रद्द होतील. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की सोमय्यांना नाक घासून माफी मागावे लागले. किंवा त्यांना आम्ही दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचे १०० कोटी द्यावे लागतील."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com