Thane Hospital News : एका रात्रीत १७ रुग्ण कसे दगावले? रुग्णालय व्यवस्थापनाने केला खुलासा..

Thane Hospital Incident News : "पाचशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जवळजवळ सहाशे रूग्णांना अॅ़डमिट केले आहेत.."
Thane Hospital Incident News
Thane Hospital Incident News Sarkarnama
Published on
Updated on

Thane Hospital News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्ण दगावले आहेत. या रुग्णालयातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. ढिसाळ कारभार वारंवार समोर येऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही या घटनेवरून मुख्यमंत्री व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेवर आता रूग्णालय व्यवस्थापनाने पत्रकार परिषद घेत खुलास केला आहे. (Latest Marathi News)

Thane Hospital Incident News
Supriya Sule On Thane Hospital Incident : ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत १७ रूग्ण दगावले; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना म्हणतात...

या रूग्णालयाचे डीन यांनी पत्रकार परिषेद घेऊन या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, गेल्या चोवीस तासांमध्ये १८ पेशंटचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच रूग्णांना ताप, दम लागणे आणि फुप्फुसांचा संसर्ग असे व्याधी होते. यापैकी एका रूग्णाला ६ हजार ब्लेडप्लेट्स होते. असे अत्यावस्थ रूग्ण आमच्याकडे येतात. अशा रुग्णांवर आम्ही उपचार केले आहेत. एका पेशंटचा अल्सर फुटला होता. एका रूग्णाने केरोसीन प्यायलं होतं,चार वर्षाचा मुलगा आहे. पण नाही वाचवू शकलो."

Thane Hospital Incident News
शरद पवार - अजित पवार गुप्त बैठकीवर Sanjay Raut बघा काय म्हणाले ? | Shivsena UBT | Sarkarnama

डीन पुढे म्हणाले, "पाचशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जवळजवळ सहाशे रूग्णांना अॅ़डमिट केले आहेत. आम्ही यथाशक्ती काम करत आहोत. कर्मचारी २४ तास- ३६ तास काम करत आहेत. आम्ही कोणत्याही पेशंट्सना नाकारत नाही. इकडे येणारे रूग्ण गरीब असतात. आम्ही कसंही करून त्यांना दाखल करतोच. काही लोक पैसे नसताना येतात, काही अत्यावस्थ स्थितीत येतात. जेवढ आमच्याकडून करायचं आम्ही ते करत असतो, असे खुलासा त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com