'डी गॅंग कनेक्शन, आर्थिक व्यवहार प्रकरणी राणा दांपत्य चौकशीतून सुटलंच कसं?'

Sanjay Raut| Navneet Rana| Ravi Rana| मुंबई, महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्यामागे डी गॅंगचा पैसा
Sanjay Raut| Navneet Rana| Ravi Rana|
Sanjay Raut| Navneet Rana| Ravi Rana|sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : 'राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले आणि ते त्या भक्तीत इतके डुंबले की मुंबईत धिंगाणा घालू लागले. मुंबईचे (Mumbai) वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्रात (maharashtra) जे भोंगे प्रकरण सुरु आहे, मुंबईमध्ये जे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्यामागे अंडवर्ल्ड कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या १५ दिवसात राज्यात, मुंबईत जे सुरु आहे त्यामागे डी गॅंगचा पैसा लागला असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.

आज सकाळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राणा दाम्पत्याने युसुफ लकडावालाशी केलेल्या आर्थिक व्यवहारासंबंधी भाजपवर निशाणा साधला आहे. 'डी गँगचा फायनान्सर युसुफ लकडावाला याचे राणांशी कसे आर्थिक हितसंबंध असल्याचा एक छोटासा पुरावा समोर आला आहे. याची चौकशी इडी कडून का झाली नाही. जर लकडावालाने मनी लॉंण्ड्रिंग केलं आहे आणि हा मनी लॉंण्ड्रिंगचा पैसा फिरवला आहे तर त्यातला ऐंशी लाख रुपयांचा एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहे. हे पैसे का घेतले कशासाठी घेतले हा तपासाचा भाग असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut| Navneet Rana| Ravi Rana|
शिवसेनेने पुन्हा डिवचले; रक्ताऐवजी धमन्यांत टोमॅटो सॉस भरला की....

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, डी कनेक्शनशी संबंधित डॉन, त्याच्याकडून घेतलेल्या पैशाचा वापर कशासाठी आणि कुठे झाला, एवढेच पैसे आहेत की अजून काही व्यवहार आहेत, याचा तपास सर्वात आधी मुंबईच्या EOW ने का केला नाही. कारण हा लकडावाला EOWच्याही कस्टडीत होता. त्यानंतर तो ईडीच्या कस्टीत गेला, या सर्वांचा तपास होणं गरजेच आहे. जर आमची मालमत्ता जप्त केली, चौकशी केली, आमच्या नेत्यांना अटक केली, मग राणा दाम्पत्यांना यातून का अद्याप वाचवंल गेलं?, याच्या मागे कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत. त्याच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करत आहेत, असाही सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

हे फक्त एक प्रकरण आहे, अशी अनेक प्रकरणे माझ्याकडे आली आहेत जी मी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी सुपुर्द केली आहेत. EOW ने राणांची चौकशी आधी का केली नाही.युसुफ लकडावाला त्यांच्या ताब्यात असताना EOW मध्ये असे कोणाचे हस्तक होते की त्यांनी नवनीत राणांना साधं चौकशीसाठी सुद्धा का बोलवल नाही?, असा सवाल राऊतांनी केला आहे.

माझा प्रश्न इडी ला आहे जर २०- २५ लाखांसाठी तुम्ही आमच्या संपत्तीवर टाच आणता आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकला, २०० कोटींच्या मनी लॉंण्ड्रिंग प्रकरणात इतर सर्वांना इडीने चौकशीसाठी बोलवलं मग यातून नवनीत राणाच कशा काय सुटल्या, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पत्र लिहीणार आहे, असही संजय राऊतांनी सांगितलं. या प्रकरणी देवेंद्र फडणवीसही शांत का आहेत. इतर वेळी पोपटासारखे बोलणारे भाजप नेते नवनीत राणा, डी गॅंग कनेक्शन, युसुफ लकडावाला यांच्या चौकशीची मागणी भाजप नेत्यांनीच केली पाहिजे, असे आव्हान संजय राऊत यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com