INDIA Logo : 'इंडिया'चा 'लोगो' कसा असणार ? नेत्यांच्या गुप्ततेमुळे उत्सुकता शिगेला !

Mumbai Meet Of INDIA : लोगोबाबत २८ पक्षांतील एकही नेता बोलण्यास तयार नाही
INDIA Leaders
INDIA LeadersSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : देशात मोदींना रोखण्यासाठी भाजपविरोधकांनी इंडिया आघाडीच्या छत्राखाली मोट बांधून लोकसभेची रणनीती आखली जाणार आहे. यासाठी मुंबईत इंडियातील नेत्यांची दोन दिवशीय बैठक होणार असून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मोदींना टक्कर देण्यासाठी आणि एकजूट दाखवण्यासाठी इंडियाच्या लोगोचे अनावरण मुंबईत होणार आहे. मात्र याबाबत कुणीही स्पष्टपणे सांगत नसल्याने देशाला लोगोची उत्सुकता लागली आहे. (Latest Political News)

मुंबईत इंडियाची INDIAआजपासून दोन दिवस ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक होत आहे. या बैठकीत संपूर्ण देशातील २८ प्रमुख पक्षाचे ६३ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच या बैठकीदरम्यान इंडियाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र हा लोगो कसा असणार, याबाबत कुणीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून आले. परिणामी इंडिया मोदींच्या नेतृत्वातील एनडीएला रोखण्यासाठी कोणत्या आणि कशा लोगोचा उपयोग करणार, याची चर्चा सुरू आहे.

INDIA Leaders
Sharad Pawar News: मोठी बातमी ! 'इंडिया'वर शरद पवारांची छाप; खर्गेंचे 'पॅकअप'?

इंडियाचा लोगो कसा असणार या बाबत नेतेमंडळीकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. याबाबत कुठल्याच पक्षाच्या नेत्याकडून काहीच व कसलीच माहिती दिली जात नसल्याने लोगोबाबत कसलाही अंदाज बांधणे कठीण झाले आहे. या लोगोत देशाचा रंग असणार की तिरंग्याची झलक याबाबत कुणीही बोलत नाहीत. त्यांच्याकडून पाळल्या जात असलेल्या गुप्ततेमुळे लोगोबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे.

INDIA Leaders
Sudhir Mungantiwar On INDIA : मोदींच्या नरडीचा घोट घेणाऱ्यांचीच तिरडी वर जाईल; मुनगंटीवार 'इंडिया'वर गरजले..

दरम्यान, इंडियाच्या लोगोचे नऊ डिझाईन तयार असल्याची माहिती आहे. यापैकी एक लोगो फायनल केला जाणार आहे. या डिझाईनवर कोणी काम केले, याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे लोगोतील रंगसंगती, डिझाईनबाबत माहिती बाहेर येत नाही. परिणामी लोगो कसा असणार हे आता अनावरण केल्यानंतर लक्षात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com