Sharad Pawar News: मोठी बातमी ! 'इंडिया'वर शरद पवारांची छाप; खर्गेंचे 'पॅकअप'?

INDIA Mumbai Meet : इंडियाची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरणार, लोगो अनावरण होणार
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Mumbai Political News : मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडियातील प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी रणनीती आखणार आहे. यात अनेक मोठे निर्णय होणार असले तरी इंडियाच्या संयोजकपदी कुणाची निवड होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संयोजकपदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र या पदासाठी इतर पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नाव पुढे करण्याची माहिती आहे. यामुळे इंडियावर शरद पवारांची छाप पडल्याचे दिसून येत आहे. आता संयोजकपदाबाबत बैठकीत काय निर्णय होणार, याची देशाला उत्सुकता आहे. (Latest Political News)

मुंबईतील बैठकीला एकूण २८ पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याने यावेळी कोणते निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण होणार आहे. तसेच शुक्रवारी इंडिया आघाडीची सकाळीच महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात आघाडीच्या पुढच्या स्ट्रॅटेजीवर चर्चा होणार आहे.

Sharad Pawar
Balasaheb Thackeray Banner: 'शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही'; बॅनर लावून उद्धव ठाकरेंना कुणी डिवचले ?

शरद पवारच का ?

'इंडिया' INDIA आघाडीच्या संयोजक पदावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. संयोजकपदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. हे दोन्ही नेते या पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. तर या पदासाठी शरद पवार यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांचे नाव इंडिया आघाडीतील काही घटक पक्षाकडून पुढे केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार हे पद घेणार का? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार (Sharad Pawar) या दोन्ही नेत्यांचे सर्वच राजकीय पक्षांशी सलोख्याचे संबंध आहेत. शरद पवार यांचे तर सत्ताधारी पक्षांशीही सलोख्याचे संबंध असल्याने पवार यांच्याकडे संयोजकपदाची धुरा जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar
Rahul Gandhi Meet Party Workers : बैठक 'इंडिया'ची, आढावा महाराष्ट्राचा; राहुल गांधींचा एक तीर, दोन लक्ष्य !

इंडिया आघाडीतील संयोजक पद सेकंड फळीतील नेत्याला देण्याची चर्चा सुरू होती. पक्षप्रमुख हे निवडणुकीच्या रणनीती आणि सभांमध्ये व्यस्त असतात. तिकीट वाटपातही हे नेते व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्याकडे संयोजक पद दिल्यास ते या पदाला किती वेळ आणि न्याय देऊ शकतील याबाबतची शंका आहे. परिणामी सेकंड फळीतील नेत्यावर ही जबाबदारी देण्याची चर्चा सुरू होती. त्यावरही या बैठकीत खल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com