Obc Melawa : ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलाय का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं...

Chhagan Bhujbal :भिवंडीच्या मेळाव्यात सांगितलं, मला आणि माझ्या मुलांना...
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi : राज्यभर छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, असे सांगत ओबीसींचे मेळावे घेत आहेत. मात्र, ओबीसींच्यासाठी लढणाऱ्या छगन भुजबळांनी ओबीसीमधून आरक्षण घेतलंय का? असा सवाल विचारला जात होता. त्याला भिंवडींच्या सभेत छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं. मी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतला नाही. माझ्या मुलाला देखील या आरक्षणाचा लाभ नको. मात्र, ओबीसी समाज गरीब आहे. म्हणून मी त्यांच्या हक्कासाठी भांडतोय, असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Bhiwandi OBC Melawa : "ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचा कार्यक्रम करा"

मी आरक्षण घेतलं नाही. कुटुंबीयांनी ही आरक्षण घेतलं नाही. येथून पुढे ही आरक्षण घेणार नाही. मात्र ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी येत असल्याने मी लढा देतो आहेत, असे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. तसेच आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसींमध्ये त्यांना वाटेकरी करू नका, असे भुजबळ म्हणाले.

ओबीसीमध्ये ३७४ छोट्या छोट्या जाती आहेत. आधीचे कुणबी आम्हाला मान्य आहेत. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कुणबीची खोटी प्रमाणपत्र दिली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्र रद्द करण्याची आम्ही मागणी करतोय. मराठा समाजाच्या महामंडळाला एक रुपयामध्ये जागा मिळते. मात्र, महाज्योतीच्या जागेसाठी १२८ कोटी रुपये द्या मग जागा घ्या, असे सांगितले जाते, असे म्हणत भुजबळांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.

जरांगेंच्या किडन्या किडल्या

जरांगे आमची लायकी काढतो. दारु पिऊन त्याच्या किडण्या किडल्या. तो सासरच्या भाकरी खातो, असे म्हणत मनोज जरांगे यांच्यावर भुजबळांनी जोरदार हल्ला केला. आम्ही ६० टक्के असल्याचा दावा जरांगे करतो. मात्र, आम्हीच ५४ टक्के आहोत. तर मग तुम्ही ६० टक्के कसे, असा सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केला.

खोटी ओबीसी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप

राज्यभर मराठा समाजातील ओबीसी नोंदी तपासण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समिती नेमली आहे. मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात सापडलेल्या नोंदीनुसार ओबीसी प्रमाणपत्र देखील वाटप केली जात आहेत. मात्र, छगन भुजबळ यांनी आपल्या सरकारच्या कामावर आक्षेप घेत निवृत्त न्यायमुर्ती शिंदे खोटे दाखले देत फिरतायेत असा आरोप केला आहे.

आमदारांनी ही दिलं उत्तर

भुजबळ खोटं बोलतं असल्याचा आरोप विधानसभेत आमदार तनपूरे, आमदार बच्चू कडू यांनी केला होता. त्याला देखील भुजबळ यांनी उत्तर दिले. जी महिला सरपंच आमच्या सभेला आली तिला गाव बंदी केली, असे म्हणत भुजबळांनी वर्तमानपत्रात आलेली बातमीच दाखवले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com