त्यानंतर मी रामदास कदमांवर बोलायचे सोडून दिले आहे : आदित्य ठाकरेंचा हल्लोबाल

या भेटीत कदम आणि किर्तीकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती.
Aditya Thackeray-Ramdas Kadam
Aditya Thackeray-Ramdas Kadam Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यामध्ये बुधवारी (ता. २७ ऑक्टोबर) बंद दाराआड चर्चा झाली होती. त्या भेटीनंतर रामदास कदम यांनी खासदार किर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले होते. त्यावर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया देताना ‘मी त्यांच्यावर बोलायचे सोडून दिले आहे,’ असे नाव न घेता निशाणा साधला आहे. (I have stopped talking about Ramdas Kadam : Aditya Thackeray)

रामदास कदम यांनी पाडव्याच्या दिवशी मुंबईचे खासदार गजानान किर्तीकर यांची भेट घेतली होती. या भेटीत कदम आणि किर्तीकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. त्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ‘खासदार गजानान किर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत’ असे वक्तव्य कदम यांनी केले होते. त्यानंतर किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, खुद्द किर्तीकर यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे.

Aditya Thackeray-Ramdas Kadam
बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि हर्षवर्धन पाटलांचे जावई उतरणार राजकारणात

रामदास कदम यांच्या त्या वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, रामदास कदम यांनी मध्यंतरी आमच्या परिवारावर म्हणजे माझ्यावर, माझ्या आईवर जे घाणेरेडे आरोप केले आहेत. त्याच्यानंतर मी रामदास कदम यांच्यावर बोलायचेच बंद केलेले आहे. कारण, मला स्वःताचे हात चिखलात घालायचे नाहीत.

Aditya Thackeray-Ramdas Kadam
Cabinet Expansion : शिरसाट, गोगावले, बच्चू कडू यांना मंत्रिपदे निश्चित? : भाजप अन्‌ शिंदे गटाकडून प्रत्येकी चौघांना संधी

खोके सरकार कुठेही निवडणूक घ्यायाला तयार नाही. खोके सरकार हे निवडणुकीला घाबरते, हे आता स्पष्ट झाले आहे. हे सरकार निवडणुकीला घाबरत नसतं आणि जनमत त्यांच्यासोबत असतं तर चाळीस गद्दारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवली असती. आमदारकीचा राजीनामा देण्यास आणि निवडणुकीला सामोरे जाण्याची खोके सरकारची तयारी नाही. घाबरून खोके सरकार काम करतंय आणि निवडणूक लवकर घेणार नाही, असे याचं काम चालू आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com