Mumbai News, 16 Oct : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजाच्या सर्व मागण्या महायुती सरकारने पूर्ण कराव्या, अशी मागणी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.
मात्र, आचारसंहिता लागू झाली तरीही सरकारने मराठा समाजाचा प्रश्न मार्गी न लावल्याने जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार असल्याचं स्पष्ट केलं.
गुरुवारी महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये बोलताना त्यांनी आरक्षण देणार असल्याचं स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेत त्यांना जरांगेंबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले, "मी जे बोलतो ते करतो. मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार आहे. मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल.
मी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यानंतर तात्काळ विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण दिलं." तसंच याआधी देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण कोणी घालवलं? ते त्यांना कोर्टात टिकवता आले नाही.
आताही आम्ही आरक्षण दिलं आहे, ते रद्द करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु आहे, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मराठवाड्यात कधी कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. मात्र, आम्ही ते जस्टीस शिंदे कमिटी स्थापन केली. इतकी वर्षे ज्यांच्या हातात संधी होती, सत्ता होती, त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला.
जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की, महायुतीने काय काय दिलं, सारथी दिलं. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं. ओबीसींप्रमाणे मराठ्यांना सवलती दिलं आणि मराठा समाजाला कोणी वंचित ठेवलं याचा विचार मनोज जरांगे यांनी करायला पाहिजे, असंही म्हंटलं.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 'मराठा समाजाला आरक्षण फक्त शिंदेसाहेबच देऊ शकतात. तेवढाच धाडसी माणूस आहे जो, मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो', असं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.