Uddhav Thackeray on Election Commission: माझी शिवसेना मी परत घेणारच..; न्यायालयाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे थेट बोलले...

Maharashtra Politics | उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं, असही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निरीक्षण नोंदवलं..
Uddhav Thackeray on Election Commission:
Uddhav Thackeray on Election Commission: Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray on Election Commission : सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. पण मी राजीनामा दिला नसता तर न्यायालयाने पुन्हा एकदा मला मुख्यमंत्रीपद दिलं असतं, अशी महत्त्वाची प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (I will take back my Shiv Sena..; Uddhav Thackeray spoke directly on the court decision)

गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. यात शिंदे-फडणवीस सरकार, राज्यपालांच्या भूमिकेवर, इतकेच नव्हे तर निवडणूक आयोगावरही न्यायालयाने ताशेरे ओढले. (Supreme Court Hearing on Maharashtra Politics) सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना तुम्ही अगोदरच राजीनामा दिला आहे, त्यामुळे ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी कसे बसविणार, अशी विचारणाही केली.  

Uddhav Thackeray on Election Commission:
Supreme Court Live : शिंदे गटाला मोठा धक्का; भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर; न्यायालयाचा मोठा निर्णय

न्यायालयाच्या या निर्णय़ावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी राजीनामा दिला नसता तर न्यायालयाने मला पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. पण सत्तेसाठी हपापलेल्या लोकांमुळे मी राजीनामा दिला. पण मी माझ्यासाठी लढत नव्हतो, राज्यातील जनतेसाठी लढत होतो. ज्या लोकांना माझ्या वडीलांनी मोठं केल, राजीनामा देण कायदेशीरदृष्ट्या योग्य नसलं तरी, गद्दारांनी माझ्यावर अविश्वास आणणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी नैतिकतेने राजीनामा दिला. पण आज न्यायालयाने त्यांनाही फटकारलं आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याच नैतिकतेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. असंही ठाकरेंनी यावेळी म्हटलं. (Maharashtra Political Crisis)

न्यायालयाने भरत गोगावले यांची प्रतोद पदाची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे माझ्या शिवसेनेचा व्हिप त्यांना मान्य करावा लागणार आहे. फुटलेला गट पक्षावर दावा करु शकत नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने त्यांचं काम त्यांच्या चौकटीत केलं पाहिजे, निवडणूक आयोग हे निवडणुकीपर्यंत मर्यादित असतं. एखाद्या पक्षाला नाव आणि चिन्ह देणं हे आयोगाचं काम असतं. चिन्ह काढून घेणं हे त्यांचं काम नाही. (Maharashtra Politics)

Uddhav Thackeray on Election Commission:
Supreme Court Live : मुख्यमंत्री शिंदेना न्यायालयाचा दुसरा दणका; राज्यपालांची कृती बेकायदेशीर; न्यायालयाचा मोठा निर्णय

बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन शिवसेनेची स्थापना केली नव्हती. त्यामुळे कदापिही शिवसेना हे नाव आम्ही त्यांना घेऊ देणार नाही, निवडणूक आयोगाचा तो घटनाबाह्य अधिकार आहे. आयोग माझ्याकडून शिवसेनेचं नाव, चिन्ह काढून घेऊ शकत नाही आणि मी ते त्यांना काढून घेऊ शकत नाही.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com