बाळासाहेबांनी माझा हात पकडला नसता तर...आठवणीत राऊत भावूक

शरद पवार आणि बाळासाहेब यांची मैत्री हे पडलेले कोडे असायचं.
Sanjay Raut & Balasahe Thackeray Latest News
Sanjay Raut & Balasahe Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आठवणीने मी नेहमी भावूक होतो. बाळासाहेबांनी माझा हात पकडला नसता तर हा संजय राऊत दिसला नसता. त्यांना जसा हवा होता तसा त्यांनी संजय राऊत घडवला, अशी भावनिक प्रतिक्रिया शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनावर बोलत होते. यावेळी ते भावूक झाले होते. (Sanjay Raut Latest Marathi News)

Sanjay Raut & Balasahe Thackeray Latest News
त्यावेळी राऊतांकडे काहीच उत्तर नव्हते...नवनीत राणांनी सांगितला लडाख दौऱ्याचा 'तो' प्रसंग

मुंबई विद्यापीठातील 'बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा'त दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात नामवंत छायाचित्रकारांनी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. या फोटोत बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक मान्यवरांसोबतचे फोटो आहेत. कामगार नेते, बंदसम्राट जॉर्ज फर्नांडीस, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, शरद पवार यांच्यासोबतचे बाळासाहेबांनी घालवलेले क्षण कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आले आहेत. त्याच चित्रांचं प्रदर्शन मुंबई विद्यापीठात भरवण्यात आलं आहे. आज या छायाचित्र प्रदर्शनास राऊतांनी भेट दिली.

राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवले. विश्वासघात करायचा नाही, पाठीत खंजीर खुसायचा नाही हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले आहे. तसेच शरद पवार आणि बाळासाहेब यांची मैत्री हे पडलेले कोडे असायचं. ते एकमेकांवर राजकीय टीका करायचे मात्र त्यांची मैत्री कायम होती. राज ठाकरे यांना मी आमंत्रण देतो त्यांनीही हे छायाप्रदर्शन पाहायला यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी राज ठाकरेंना केले.

ते म्हणाले, बाळासाहेबांनी राजकारण बदलल आहे. दिल्लीतुन चालणाऱ्या राजकारणाचा केंद्रबिंदू त्यांनी मुबंई ठरवला. बाळासाहेबांच्या आठवणीने मी नेहमी भावुक होतो. बाळासाहेबांनी माझा हात पकडला नसता तर हा संजय राऊत दिसला नसता, अशी प्रतिक्रिया देतांना मात्र ते भावूक झाल्याचे बघायला मिळाले.

Sanjay Raut & Balasahe Thackeray Latest News
भीती वाटत असेल तर, राज यांनी अयोध्येला आदित्य यांच्यासोबत जावं !

तर संभाजीराजेंनी 42 मतं जमवली असतील...

राज्यसभा निवडणुकीबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, संभाजीराजेंबद्दल आदर आहे. मात्र, शिवसेनेने ही जागा का लढवू नये. त्या जागेवर कोणाची मालकी नाही. संभाजीराजे हे आदरणीय आहेत. ते निवडणुकीत उतरले आहेत याचा अर्थ त्यांनी 42 मतं जमवली असतील, असा टोला त्यांनी संभाजीराजेंना लगावत आमच्याकडे ही अधिक मते नाहीत त्याची जुळवाजुळव करावी लागते. असे सांगत या निवडणुकीत आम्ही घोडेबाजार होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com