भीती वाटत असेल तर, राज यांनी अयोध्येला आदित्य यांच्यासोबत जावं !

"राजसाहेबांना जर भीती वाटत असेल तर त्यांनी आदित्य ठाकरे साहेबांना विनंती करावी, कदाचित अयोध्याला एकत्र जाता येईल,"
Dipali Sayyed , Raj Thackeray
Dipali Sayyed , Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काही महिन्यांपासून अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) सातत्याने मनसेवर हल्लाबोल करीत आहेत. आज (ता.20 मे) दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यांवरुन पुन्हा टीका केली आहे.

"अयोदध्येचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे आहे. भूमिका स्पष्ट नसलेले नेते स्वयंघोषित हिंदुजननायक होऊ शकणार नाहीत, राजसाहेबांना जर भीती वाटत असेल तर त्यांनी आदित्य ठाकरे साहेबांना विनंती करावी कदाचित अयोध्याला एकत्र जाता येईल," असे सय्यद म्हणाल्या. त्या 'साम' या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

दिपाली सय्यद म्हणाल्या, "आपण कुठला मुद्दा घेऊन येतो आहे, आपल्या तरुण पिढीला आपण काय शिकवतोय,आज आपण हिंदु-मुस्लिमांच्या मुद्यांवर चर्चा करतो. त्यांच्या डोक्यात वेगळी गोष्ट भरवली जाते. तरुणांचा विकास कसा झाला पाहिजे. त्यांना रोजगार कसा मिळेल, याबाबत ते बोलत नाही. आज पाच-सहा वर्षात महागाई वाढत आहे, यावर ते बोलत नाही,"

Dipali Sayyed , Raj Thackeray
प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांना भाजपचा दणका ; आठ वर्षांनंतर कारवाई

"महागाईच्या मुद्यांवर भाजपच्या नेत्यांनी पूर्वी आंदोलन केलं होते. ते आता कुठे आहेत. हे लोक फक्त सत्तेसाठी लाचार झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात राज्यासाठी कुठलेही कर्ज घेतले नाही," असे दिपाली सय्यद म्हणाल्या.

बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना खुलं आव्हान केले होतं.अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंना आव्हान देताना दिपाली सय्यद यांनी “सभा घ्यायच्याच असतील, तर अयोध्येमध्ये घेऊन दाखवा. पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, ते ही जास्त गर्दी करून”,असं ट्वीट केलं होतं. यानंतर त्यांनी मनसेवर खोचक टीका करणारा व्हिडीओ संदेश जारी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com