

Naresh Mhaske: ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण अद्यापही तापलेलंच आहे. ठाकरेंच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्यानं टार्गेटवर असून ठाकरेसेनेनं काल ठाण्यात रास्ता रोको आंदोलन केल यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळं खासदार नरेश म्हस्के हे आक्रमक झाले असून ठाण्यात येऊन जर एकनाथ शिंदेंना टार्गेट करत असाल तर परत जाणार नाहीत, अशा धमकीवजा इशारा दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काल रात्री ठाण्यात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी अटक करा, अटक करा... एकनाथ शिदेंना अटक करा...अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी झालेल्या वाहतूक कोंडींत सार्वजनिक बस, अवजड वाहनं, रिक्षा, दुचाकी अशा सर्व प्रकारची वाहनं अडकून पडली होती. रात्री उशीरा सुरु असलेल्या या सर्व घडामोडींमुळं ठाण्याचे लोकप्रतिनिधी असलेले प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, तुम्ही जर जाणीवपूर्वक ठाणेकरांना वेठीस धरत असाल आणि त्यासाठी रात्री दोन-तीन वाजता आम्हाला लोकांचे मेसेज येत असतील पोलिसांवर तुम्ही हल्ला करत असाल तर सुसंस्कृत ठाणे शहरातील हा प्रकार खपवून घेतलं जाणार नाही. पण या हत्याकांडाचा आम्ही निषेधच करतो यातील जे आरोपी असतील त्यांना भर चौकात फाशीवर लटकवलं पाहिजे, पण जर या सगळ्या गोष्टींचं राजकारण करुन एकनाथ शिंदेंचं नाव खराब करण्याचं काम कोणी करत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही.
यामुळं खासदार नरेश म्हस्के हे प्रचंड आक्रमक झाले होते. "मुंबईत कुठे बैठका झाल्या? काय स्क्रीप्ट लिहिली जाते? रोज कशी पाठली जाते? कशा पद्धतीनं आंदोलन केलं जातंय. या सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहेत. त्यामुळं विरोधकांना आमचं पुन्हा एकदा सांगणं आहे की, आमचा अंत पाहू नका, आम्ही मूळ शिवसैनिक आहोत त्यामुळं ठोसास ठोसा देऊ. जशास तसे आम्ही वागू आणि यापुढे शिंदेंच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं आपण ठाण्यात येऊन वक्तव्य कराल तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाहीत" अशा शब्दांत खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंना थेट धमकीवजा इशाराच दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.