Ajit Pawar Challenge to Shinde-BJP: तुमची एवढी लोकप्रियता आहे तर निवडणुका घेऊन दाखवा : अजित पवारांचे राज्य सरकारला खुले आव्हान

Maharashtra Politics : राज्यातील काही प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आज शिंदे-भाजप सरकारच्या आलेल्या सर्वेक्षणाच्या जाहिरातीवरुन अजित पवारांनी निशाणा साधला आहे.
Eknath Shinde : Ajit Pawar
Eknath Shinde : Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Challenge to Shinde-BJP : राज्यातील काही प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरच आज (13 जून) भाजप आणि शिंदे सरकारच्या सर्वेक्षणाची जाहिरात आली आहे. भाजप -शिंदेंनी सर्वेक्षणाचा हा विश्वविक्रमच केला. पण हे सर्वेक्षण कुणी, कोणत्या निकषावर केलं, त्यामागंच कारणही समजलं नाही. अशी जाहिरात कधी पाहिली. पण जर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारची एवढी लोकप्रियता असेल तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनतेच्या मैदानात निर्णय होऊ द्या, असे खुले आव्हान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे.

आज राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर झळकलेली जाहीरात विशेष लक्ष वेधून घेत आहे. या देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशा आशयाचे फलक-हेर्डिंग्ज्स दिसत होते. मात्र आता देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाच्या मथळ्याखाली जाहीराती प्रसिद्ध होत आहेत.  मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारच्या या जाहिरातींचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Eknath Shinde : Ajit Pawar
NCP News : विदर्भातील लोकसभेच्या जागांवर राष्ट्रवादी लक्ष केंद्रीत करणार; उद्या बैठकीत ठरणार...

पण ही जाहितात देताना त्या जाहिरातीत दिवंगत बाळासाहेबा ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटोही टाकला नाही. हा त्यांच्या अपमान नाही का, जाहिरात देताना राज्य सरकारने राज्याचा विकास आणि महत्त्वाचे प्रश्न पद्धतशीरपणे बाजूला ठेवले आहेत. पण मी कसा लोकप्रिय याची स्पर्धाच जणू सत्ताधाऱ्यामध्ये सध्या सुरु आहे. असा टोलाही अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावला आहे. (Maharashtra Politics)

गेल्या विधानसभा निवडणुकांवेळी राज्यात केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा करण्यात आली होती. पण आता राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा, आजच्या जाहीरातीत शिंदेच्या शिवसेनेकडून दिली गेली आहे. ही घोषणा भाजपच्या नेत्यांना, भाजप प्रदेशाध्यक्षांना हे भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपच्या लोकांनी याचा खुलासा करावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा (Devendra Fadavis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक वाढली, असे अजित पवार म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com