Vidarbha News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha News) सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. भाजपकडून लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय निवडणुक प्रमुखांच्या नेमणुका केल्या होत्या. तर काँग्रेसकडून ४८ मतदारसंघांची आढावा घेणारी बैठक घेतली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही (NCP News) या निवडणुकांच्या तयारीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच दृष्टीकोनातून आता पक्षाकडून बैठक घेण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आता लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागली आहे. विदर्भातील लोकसभा जागांबाबत राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. विदर्भातील राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर जिंकण्याच्या दृष्टीकोनातून पक्षाकडून चाचपणी करण्यात येणार आहे. विदर्भाच्या जागावंरील विचार विनिमय करण्यात येणाऱ्या या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार, विदर्भातील पक्षनेते व माजी मंत्री अनिल देशमुख, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यात ही बैठक होत आहे.
विदर्भातील जागांवर काँग्रेसचा दावा -
आगामी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने राज्यातील एकवीस लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पक्षाला सकारात्मक वातावरण असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचा निरीक्षण आहे. महाराष्ट्र काँग्रेसने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यानंतर आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला असल्याची माहिती मिळत आहे. यामधील बहुतांश जागा या विदर्भातील आहेत.
तसेच ठाकरे गटाकडूनही विदर्भातील काही जागांवर दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi News) आगामी लोकसभेच्या अनुषंगाने जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील जागांवर तिन्हीपक्षांमध्ये होणार रस्सीखेचात कुणाल किती आणि कोणत्या जागा मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.