MPSC Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; कोतवाल पदभरतीत महसूल विभागाने केले मोठे बदल !

Government Job: कोतवाल पदभरतीत महसूल विभागाने नेमकी काय बदल केले?
MPSC Exam:
MPSC Exam:Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : कोतवाल पदभरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या कोतवाल पदभरती जाहीर झालेली आहे. मात्र, या कोतवाल पदभरतीत महसूल विभागाने मोठे बदल केले आहेत. त्यामुळे या भरतीत नेमकी काय बदल करण्यात आलेत, हे जाणून घेणं विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे.

राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या कोतवालपदाच्या पदभरतीत बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी दोन टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा आता 100 गुणांची एकाच टप्प्यात घेत मुलाखत रद्द करण्यात आली आहे.

MPSC Exam:
Rahul Gandhi Opposition Meeting : देशासाठी बलिदान करण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधींचा निर्धार

कोतवाल हे पद मानधन तत्वावरील आहे. हे पद शासकीय कर्मचारी म्हणून नाही. यासाठी वयोमाऱ्यादा 18 ते 40 असून 10 वी पास शिक्षण हे ग्राह्य धरले जाते. यापूर्वी या पदासाठी पाच हजार मानधन होते. 2019 ला यामध्ये वाढ करून 7500 करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या मानधनात वाढ करण्यात आली. आता 15000 रुपये मानधन करण्यात आले आहे.

या पदासाठी लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची होणार आहे. तर 50 प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे विचारले जाणार आहेत. एक प्रश्न दोन मार्कासाठी असणार आहे, अशी माहिती महसूल विभागाने शाषन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे.

MPSC Exam:
NCP State President News : राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष ओबीसी करण्याच्या हालचालींत सर्वांच्या नजरा नागपूरकडे !

दरम्यान, कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात. प्रत्येक साझासाठी एक कोतवाल असतो. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदाला आहेत.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com