Imtiaz Jaleel Video : 'तोतला आला अन्..., किरीट सोमय्यांना माजी खासदाराने डिवचले, 'हिरवा मुंब्रा' प्रकरणात थेटच बोलले

MIM controversial statement: मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख चर्चेत आले आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटले आहेत. आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
Imtiaz Jaleel Slams BJP
Imtiaz Jaleel Slams BJPSarkarnama
Published on
Updated on

Imtiaz Jalil News : मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी वादग्रस्त विधान केले होते. सबंध मुंब्रा हिरवा करू, या त्यांच्या विधानाने नवा वाद उभा राहिला आहे. यासंदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत पोलिसा तक्रार केली होती. त्यानंतर सहर शेख यांच्यावर पोलिसांनी माफी मागण्याबाबत दबाव आणल्याचे बोलले जाते. त्यामुळे हे प्रकरण सबंध महाराष्ट्रभर चर्चेत आले आहे.

एमआयमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सहर शेख यांची भेट घेत सोमय्या यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, 'एक तोतला येतो आणि पोलिसांमध्ये जातो. त्याने जेवढी लोकं पोलिस ठाण्यात आणली त्या पेक्षा अधिक लोकं मी पोलिस ठाण्यात घेऊन येतो. तुम्ही जे अजित पवारांचे अहिल्यानगरचे आमदार मुस्लिमांवर खालच्या भाषेत टीका करतात, नितेश राणे ज्या भाषेत मुस्लिमांनावर बोलतात, भाजपची महिला नेता मुस्लिमांबाबत जी भाषा वापरतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का?'

पुढे बोलताना ते म्हणाले, मुंब्राच काय आम्ही सबंध महाराष्ट्र हिरवा करू. त्यामध्ये गैर काय? हिरवा रंग दहशतवादी आहे का? सहर यांचे हिरवा रंगा संदर्भात केलेले विधान आक्षेपार्ह कसे होऊ शकते? माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. कोणीही त्यांच्यावर दबाव आणू नये. माफी मागण्यासाठी दबाव आल्यास त्याला उत्तर देण्यास मी समर्थ आहे, असे जलील म्हणाले.

कोणत्या कायद्याने नोटीस

जलील यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपचे नेते, आमदार हे मुस्लिमांना धमकी देतात, मशिदीत घुसून मारण्याची भाषा बोलतात तेव्हा पोलिस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच सहर यांना पोलिसांनी कोणत्या कायद्याने आणि कलमाने नोटीस बजावली असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित करत सहर यांना पाठींबा दिला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com