Arvind Kejriwal Meets Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीतील सेवा नियंत्रणमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात समर्थन एकत्रित करण्यासाठी देशव्यापी दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना केजरीवाल म्हणाले, "शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वार्थाने मोठे नेते आहे. पवारांनी देशातील विरोधकांना एकत्र आणण्यात मोठं योगदान आहे.
केजरीवाल यांनी काल (24 मे ) उद्धव ठाकरे आणि आज शरद पवार यांची भेट घेतली. केंद्र सरकारने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात अध्यादेश आणला असून त्याविरोधात अरविंद केजरीवाल यांनी आता विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात केंद्र सरकारने अध्यादेश आणून दिल्ली सरकारच्या अधिकारांवर गदा आणल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. याच मुद्द्यावर आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि चर्चा केली. केंद्र सरकारने हा अध्यादेश आणून चुकीचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे संसदेत या अध्यादेशाला राष्ट्रवादी विरोध करणार असल्याचं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
दिल्लीच्या लोकांचे काम हे सरकारने केलं पाहिजे, दिल्ली सरकारच्या अधिकारांवर केंद्र सरकारने गदा आणल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. राज्यसभेत या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित यावं असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.केंद्रातल्या ईडी आणि सीबीआय या संस्थांचा वापर करुन राज्यातली विरोधी पक्षांची सरकारं पाडली जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल म्हणाले, " दिल्लीतील जनतेसोबत अन्याय सुरु आहे. २०१५ ते २०२३ कोर्टात ८ वर्षापासून आमचा कोर्टात संघर्ष सुरू आहे. 11 मे ला निकाल लागला आणि मोदी सरकारने 19 मे ला अध्यादेश (ऑर्डीनन्स) आणून सगळा हक्क पुन्हा केंद्रसरकारकडे दिला. हा फक्त दिल्लीच्या लोकांचा लढा नसून हा संपूर्ण संघराज्य व्यवस्थेलाच धक्का आहे”, असं ते म्हणाले. “बिगर भाजपा सरकार एखाद्या राज्यात आलं तर भाजपाचं केंद्र सरकार तीन गोष्टी करतं”, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले.
"ही देशासाठी धोकादायक स्थिती आहे. महाराष्ट्रातली जनता तर यामुळेच पीडित आहे. काही महिन्यांपूर्वी इथे ईडी-सीबीआयकरवी आमदारांना फोडून सरकार पाडण्यात आलं. ही देशासाठी चांगली स्थिती नाही.आम्ही यासाठी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना या विधेयकाविरोधात आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं अरविंद केजरीवाल यांनी नमूद केलं.
विरोधकांचे एकजूटीकरण करण्यासाठी या भेटी घेतल्या जात आहेत. शरद पवार भेटीवेळी आपचे संजय सिंग, राघव चड्डा,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यावेळी हेही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपस्थित होते .
याभेटी दरम्यान, आपचे संजय सिंग, राघव चड्डा,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यावेळी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यावेळी हेही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपस्थित होते .
Edited by : Rashmi Mane