Farmer Suicide : राज्यात सात महिन्यात हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Budget Session : जानेवारीपासून राज्यात १६३ शेतकरी आत्महत्या
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil : महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यावेळी शेतकरी आत्महत्यामुक्त राज्य अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आलेख काही खाली आल्याचा दिसत नाहीत. त्यातच कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर खुद्द कृषीमंत्रीच संवेदनाहीन वक्तव्य केले. त्यामुळे विधीमंडळात विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही, असे बेजबाबदार व संवेदनाहीन वक्तव्य केले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जयंत पाटील यांनी आज आपल्या भाषणात कुणाच्या सरकारमध्ये किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, याची यादीच वाचून दाखविली. या यादीतून धक्कादायक आकडा समोर आला आहे. दरम्यान, जानेवारीपासून राज्यात १६३ म्हणजे रोज एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

Jayant Patil
Imtiaz Jalil News : पंतप्रधान अवास योजनेची ४६ हजार घरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पळवली..

पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार शिंदे-फडणवीस सरकारच्या (State Government) केवळ सात महिन्याच्या कालावधीत एक हजार २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, "२०१४ ते २०१९ फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षात पाच हजार ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतरच्या २०१९ ते २०२१ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक हजार ६६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै २२ ते जानेवारी २०२३ या सात महिन्यात एक हजार २३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत."

List
ListSarkarnama
Jayant Patil
BJP News; `राष्ट्रवादी`च्या अमृता पवार, शिवसेनेच्या तनुजा घोलप यांचा भाजप प्रवेश

दरम्यान, सांगलीत एका कार्यक्रमातही जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. कृषीमंत्रीच शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असतील तर स्थिती कशी सुधारणार? शेतकऱ्यांच्या विषय नेहमीचाच आहे, अशी भावना मंत्री मनात ठेवून काम करत आहेत. यातूनच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे दिसून येते. हे सरकार शेतकरीविरोध आहे. ते शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com