Shinde Fadnavis Government Cabinet Expansion: सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला मान्यता दिल्यानंतर गेल्या वर्षभरापासून रखडेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप श्रेष्ठींनीही मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासूनही राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालीही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच तर तो छोटेखानी असेल आणि जास्तीत जास्त १० जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. (Cabinet Expansion)
शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह २० जणांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली होती. यातील सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या लक्षात घेता आणखी २३ जणांना मंत्रिपद दिले जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.
सुरुवातीला, तीन मंत्रिपदांच्या जागा रिक्त ठेवून मंत्रिमंडळ विस्तारत २० जणांना संधी दिली जाईल असा अंदाज लावला जात होता.पण आता भाजपच्या सहा व शिंदे गटाच्या चौघांना संधी दिली जाऊ शकते असही सांगितलं जात आहे. भाजपच्या (BJP) चार जणांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाऊ शकते, तर दोघांना राज्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे.
तसेच, दोन किंवा तीन मंत्रिपदांच्या जागा रिक्त ठेवून २० मंत्रिपदे भरण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पण मोठ्या विस्तारासाठी पक्षश्रेष्ठींनी अनुमती दिली नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे इच्छुकांची वर्णी लागते की नाही आणि लागली तरी त्यांना त्यांच्या मनासारखे खाते मिळते की नाही, या कडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
Edited By - Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.