Mumbai North Lok Sabha Election : दोन उमेदवारांच्या पोलिंग एजंटचे ओळखपत्र रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे? अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

Mumbai North Lok Sabha Election Result 2024 : मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरणारे रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे दोन उमेदवारांच्या नावे पोलिंग एजंटचे ओळखपत्र असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार भरत शाह यांनी केला आहे.
Ravindra Waikar
Ravindra WaikarSarkarnama

Mumbai North Lok Sabha : शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांच्या मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात लढत झाली. या लढतीत रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला. अमोल कीर्तीकर यांना निकालाबाबत संशय असून, निकालाचा वाद घेऊन ते उच्च न्यायालयात पोचले आहेत.

निवडणूक यंत्रणेवरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने संशय व्यक्त केला आहे. मतदान केंद्रावरील गोंधळावर शिवसेना ठाकरे पक्षाचा आक्षेप आहे. मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरणारे रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे दोन उमेदवारांच्या नावे पोलिंग एजंटचे ओळखपत्र असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार भरत शाह यांनी केला आहे. या आरोपामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीचे धुरळा काहीसा शांत होत विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत. परंतु मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनाविरुद्ध शिवसेना (Shiv Sena) 'सामना' काही थांबताना दिसत नाहीत. रवींद्र वायकर यांचा विजय झाला. अमोल कीर्तीकर यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निकालाबाबत संशय असून, त्याच्याशी निगडीत वेगवेगळी अपडेट समोर येते असते. अशीच एक अपडेट समोर आली आहे. या निकालाबाबतचा संशय आणखी गडद करणारी मतमोजणी केंद्रावरील अपडेट समोर आली आहे.

Ravindra Waikar
Thackeray Vs Shinde: ठाकरेंना भेटलोच नाही म्हणत शिंदेंच्या माजी आमदाराने दिलं 'हे' आव्हान

या निवडणुकीच्या रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार भरत शाह यांनी केलेला आरोप गंभीर असून, यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. पोलिंग एजंट रवींद्र वायकराचं (Ravindra Waikar) यांचे ओळखपत्र घालून काम केले जात होते का? मंगेश पंडिलकर यांच्याकडे पोलिंग एजंटचे किती ओळखपत्र होते? मंगेश पंडिलकर यांना एकच ओळखपत्र दिले होते. रवींद्र वायकर यांचा नव्हे, तर एका अपक्ष उमेदवारांच्या पोलिंग एजंटच्या ओळखपत्रावर मतमोजणी केंद्रावर पंडिलकर उपस्थित होते, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले आहे.

Ravindra Waikar
Maharashtra Budget 2024 : उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाचे वाभाडेच काढले; केली मोठी मागणी...

अपक्ष उमेदवार भरत शाह यांनी उच्च न्यायालयात याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, मुंबई उपनगर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी, रवींद्र वायकर तसेच राज्याचे पोलिस महासंचालक यांना प्रतिवादी केले आहे. अमोल कीर्तीकर यांना सुरवातीला 681 मतांनी विजयी घोषित केले होते. यानंतर वायकर यांनी फेरमोजणीची मागणी केली. तेव्हा वायकर 75 मतांनी आघाडीवर आले. अमोल कीर्तीकर यांच्या मागणीनुसार बाद 111 पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. परंतु रवींद्र वायकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवघ्या 48 मतांनी मध्यरात्री विजयी घोषित केले. तसेच मंगेश पंडिलकर यांनी मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापरासह इतर संशयात्मक मुद्यांची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com