मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रत्येक आमदाराचे मत महत्वाचे असल्याने अपक्ष आमदारांचे वजन वाढले आहे. त्यातच अपक्ष आमदार संजय शिंदे यांची कोंंडी झाल्याची चर्चा होती. पण आता त्यांनी आपले पत्ते खुले केले आहेत. महाविकास आघाडीच्या मुंबई सुरू असलेल्या बैठकीला शिंदे उपस्थित असल्याचे समजते. (Sanjay Shinde Latest Marathi News)
भाजपने धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांचे आणि संजय शिंदे यांचे साखर कारखानदारीमुळे संबंध आहेत. शिंदे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध आहेत. पण सरकार स्थापनेवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. पण त्यानंतरही त्यांच्या भूमिकेबाबत सातत्याने तर्कवितर्क लढवले जातात. आता राज्यसभेच्या निवडणुकीतही ते कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता होती. (MahaVikas Aghadi meeting in Mumbai)
या निवडणुकीतील मतदान हे उघड पद्धतीने होत असले तरी अपक्ष आमदार काय करणार, याच्यावर सारी गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे गणित या अपक्षांवर अवलंबून आहे. आघाडीने त्यासाठी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये तिन्ही पक्षातील आमदारांसह इतर मित्रपक्ष व अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकील संजय शिंदे यांनीही हजेरी लावली आहे. त्यांचा हॉटेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.
संजय शिंदे हे बैठकीला हजर राहिल्याने त्यांचा पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवारालाच असणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. या बैठकीला आणखी काही अपक्ष आमदारही उपस्थित असल्याचे समजते.
दरम्यान, महाविकास आघाडीतील संजय राऊत, संजय पवार (शिवसेना), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि इम्रान प्रतापगढी (काॅंग्रेस) या चारही उमेदवारांसाठी 168 मतांची तंतोतत गरज आहे. यापैकी तीन उमेदवारांना सुरक्षित मतांचा तंतोतंत कोटा दिला तर चौथ्या उमेदवाराला पंधरा मतांची आवश्यकता आहे.
शिवसेनेकडील पाच आमदार असे आहेत की ते एकतर छोट्या पक्षाचे असून सरकारमधे सहभागी आहेत. त्यामुळे पाच मते नक्की मिळतील. पण उरलेल्या दहा अपक्षांपैकी कितीजण मतदान करतील हा प्रश्न आहे. या दहामध्ये बहुजन विकास आघाडीेचे तीन तर याशिवाय संजय शिंदे, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर ), नरेंद्र भोंडेकर यांचा कल कोणाकडे राहील, याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे आशिष जयस्वाल आणि ऐनवेळी मंजुषा गावित आणि गीता जैन हे अपक्ष आमदारही शिवसेनेसाठी महत्वाचे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.