INDIA Alliance Meeting : पटना, बंगळुरू, मुंबईनंतर 'इंडिया'ची चौथी बैठक 'या' शहरात ? मुख्यमंत्र्यांनी घातली गळ !

INDIA Alliance Fourth Meeting : मुख्यमंत्र्यांनी सुचवले 'या' शहराचे नाव ..
INDIA Alliance :
INDIA Alliance : Sarkarnama

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मंथनासाठी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून इंडियाच्या घटक पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत २८ पक्षांचे ६३ व्हीआयपी नेते सहभागी झाले आहेत. इंडिया आघाडीची पहिली बैठक ही बिहारच्या राजधानीत पाटणा येथे झाली होती. त्यानंतर दुसरी बैठक बंगळुरू मध्ये पार पडली तर तिसरी बैठक आज मुंबईत पार पडत आहे.

विविध राज्यात बैठकांच्या आयोजनामुळे आघाडी मजबूत होत असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. आता आघाडीची पुढची बैठक कोणत्या राज्यात, कोणत्या शहरात आयोजित केली जाते, याबाबत चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

INDIA Alliance :
Rohit Pawar On NCP Crisis : राष्ट्रवादीत वाढतेय रोहित पवारांची 'पॉवर'; विरोधी नेत्यांसोबत भेटीगाठी, सुळेंनी केले 'राष्ट्रीय प्रमोशन' ?

या बैठकीसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे सद्धा उपस्थित राहिले आहेत. दरम्यान इंडियाची आजची मुंबईतील तिसरी बैठक संपल्यानंतर, यानंतरची चौथी बैठक ही तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नईमध्ये घेण्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सुचवले आहे. त्यामुळे इंडियाची पुढची बैठक चैन्नईत होण्याची दाट शक्यता आहे.

INDIA Alliance :
Ajit Pawar On One Nation One Election : पंतप्रधान मोदींच्या 'वन नेशन-वन इलेक्शन'वर अजित पवारांची भूमिका काय ?

दरम्यान, "मुंबईतील ग्रँड हयातमध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकत्रित आले असून सर्वांची बैठक सुरु आहे. या दोन दिवसीय बैठकीसाठी २८ पक्षांचे नेते मुंबईत जमले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, ममता बॅनर्जी, आरजेडीचे नेते लालू यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव, अखिलेश यादव हे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com