INDIA Alliance PC : आघाडीला महाराष्ट्रात मिळणार 'इतक्या' जागा; खर्गेंनी सांगितला आकडा!

Mallikarjun Kharge News : "कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, गुजरात, मध्यप्रदेश अशा वेगवेगळ्या प्रदेशात तोडफोडीचं राजकारण सुरु आहे."
INDIA Alliance PC
INDIA Alliance PCSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील 6 जागांवर लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. 20 मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्ही पक्षांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कवर झालेल्या एनडीएच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे, रामदास आठवले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मुंबईतील बीकेसी ग्राऊंडवर झालेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल असे नेते एका मंचावरून एनडीएला आव्हान देताना दिसले. या शक्तिप्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आज (दि. १८ मे) रोजी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikaarjun Aghadi) म्हणाले, "महायुती समाजाला तोडण्याची भाषा करत आहे. देशात चुकीच्या पद्धतीने विचार पेरले जात आहेत. लोकांना भडकवण्याच्या काम केलं जात आहे. मी आज 53 वर्षांपासून मी राजकारणात आहे. उद्धव ठाकरेही राजकारणात टिकून आहे, पण अशा पद्धतीचं राजकारण आम्ही पाहिलं नव्हतं. विश्वासघाताचं राजकारण सुरु आहे. धमकी देऊन, आमिष दाखवून तोडफोडीचं राजकारण केलं जात आहे. पक्ष चिन्ह हिसकावून घेतलं जात आहे. संविधान आणि स्वायत्त संस्थांची गळचेपी होत आहे. तपास यंत्रणाचा गैरवापर होत आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

INDIA Alliance PC
Uddhav Thackeray News : नरेंद्र मोदी शब्दांचे पक्के, पण...; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
INDIA Alliance PC
Uddhav Thackeray News : नरेंद्र मोदी शब्दांचे पक्के, पण...; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

खर्गे म्हणाले, "महाराष्ट्रात मागील दोन अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या नाहीत. हीच मोदींची लोकशाही आहे. पण आता जनता जिंकणार आहे. यांच्या दडपशाहीला बळी पडणार नाही. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, गुजरात, मध्यप्रदेश अशा वेगवेगळ्या प्रदेशात तोडफोडीचं राजकारण सुरु आहे. पण आता महाराष्ट्रात इंडिया आघाडीला ४८ पैकी ४६ जागा मिळणार आहे. आमच्या आघाडीची (Mahavikas Aghadi) गॅरंटी हे मोदींचा पराभव करणार आहे, असा विश्वास खर्गेंनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com